निती आयोग
azadi ka amrit mahotsav

राज्य सहाय्य मोहीम अंतर्गत नैसर्गिक शेती विषयक राष्ट्रीय कार्यशाळेचे नीति आयोगाकडून आयोजन

Posted On: 02 MAR 2026 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2026

नीति आयोगाने आपल्या राज्य सहाय्य मोहीम (एसएसएम) अंतर्गत नैसर्गिक शेती विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले. देशभरातील शेतकरी, धोरणनिर्माते, शास्त्रज्ञ, स्टार्ट-अप प्रतिनिधी आणि नागरी समाज संस्थांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

कार्यशाळेतील प्रमुख आकर्षण म्हणजे नैसर्गिक शेतीवरील प्रशिक्षण पुस्तिकांचे हिंदी व इंग्रजी आवृत्त्यांमध्ये प्रकाशन, या पुस्तिका शेतकरी, कृषी विस्तार अधिकारी आणि क्षेत्रस्तरीय कर्मचाऱ्यांना प्रदेशनिहाय व व्यवहार्य ज्ञान देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.

या कार्यशाळेला गुजरात व महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आभासी मार्गदर्शन लाभले. त्यांनी शाश्वत आणि शेतकरी-केंद्रित कृषी व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत नैसर्गिक शेतीमुळे मातीची सुपीकता सुधारते, उत्पादन खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, असे नमूद केले.

पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि ओडिशा येथील शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) येथील शास्त्रज्ञांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावरून नैसर्गिक शेतीकडे देशव्यापी स्तरावर वाढता कल दिसून येतो.

कार्यशाळेत कृषी-स्टार्टअप्स, नागरी समाज संस्था, प्रगत शेतकरी आणि शेतकरी उत्पादक गट यांचाही सहभाग होता. यामुळे भारतात नैसर्गिक शेतीला पाठबळ देणारी परिसंस्था अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले.

पहिल्या दिवशी एकूण 770 सहभागी उपस्थित होते. खुल्या चर्चासत्रात शेतकरी व तज्ज्ञांना नैसर्गिक शेतीचा अवलंब, प्रमाणन, बाजारपेठ, तसेच संस्थात्मक सहाय्य यांसंदर्भातील अडचणी आणि शंकांवर मुक्तपणे चर्चा करण्याची संधी देण्यात आली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्रभेटी व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला. सहभागीना नैसर्गिक शेती पद्धतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची आणि तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. क्षेत्रभेटीत विविध पिकांसाठी नैसर्गिक शेती पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस तसेच शेतावर जैव-इनपुट्सची निर्मिती आणि स्वयंचलित प्रणालीद्वारे त्यांची तयारी यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.


सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2234595) अभ्यागत कक्ष : 13