पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदुराई येथील थिरुपरंकुंदरम येथील अरुलमिगु सुब्रमण्यस्वामी मंदिरात जाऊन केली प्रार्थना
प्रविष्टि तिथि:
01 MAR 2026 7:36PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मदुराईतील थिरुपरंकुंदरम येथील अरुलमिगु सुब्रमण्यस्वामी मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली.
या पवित्र मंदिरात जाऊन,पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या शांती, समृद्धी आणि कल्याणासाठी भगवंतांचे आशीर्वाद मागितले. भगवान मुरुगन आपल्याला शक्ती, धैर्य आणि बुद्धी देऊन मार्गदर्शन करत राहतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
"वेत्रिवेल मुरुगानुक्कु आरोग्यारा!"असे आवाहन करून पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे
"वेट्रीवेल मुरुगुनुक्कु आरोग्यारा!
अरुल्मिगु सुब्रमण्यस्वामी मंदिर, थिरुप्परकुंद्रम, मदुराई येथे अशी प्रार्थना केली.
“शांती, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी भगवंतांचे आशीर्वाद मागितले. भगवान मुरुगन आपल्याला नेहमीच शक्ती, धैर्य आणि बुद्धी देऊन मार्गदर्शन करोत."
***
सुषमा काणे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2234289)
आगंतुक पटल : 76
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam