अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून मुंबईत 'जिओ पारसी' सल्लागार समितीच्या दुसऱ्या बैठकीचे आयोजन


लोकसंख्या स्थिरीकरण आणि समुदाय पाठबळ उपाययोजनांवर प्रामुख्याने भर

Posted On: 28 FEB 2026 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

 

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्र शेखर कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत जिओ पारशी' सल्लागार समितीच्या दुसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीला मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र आणि गुजरातच्या अल्पसंख्याक कल्याण विभागाचे प्रतिनिधी, बॉम्बे आणि गुजरात पारशी पंचायतीचे सदस्य आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पारशी लोकसंख्या घटण्यास कारणीभूत असलेल्या घटकांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय कल, उशिरा होणारे विवाह, सामाजिक-आर्थिक आव्हाने आणि बदलती सामाजिक पद्धती यांचा समावेश होता. हितधारकांनी समन्वित धोरणात्मक पाठबळ आणि समुदायाच्या सहभागाद्वारे या समस्या सोडवण्यासाठी आपल्या सूचना मांडल्या.

पारशी समुदायामध्ये वेळेवर आणि लवकर विवाह करण्यास प्रोत्साहन देण्याच्या विविध मार्गांवरही समितीने चर्चा केली. यामध्ये जनजागृती उपक्रमांना बळकटी देणे, समुपदेशन आणि विवाह जुळवणी मदत प्रणालीचा विस्तार करणे, पंचायती आणि संस्थांच्या माध्यमातून समुदाय स्तरावरील संपर्काला प्रोत्साहन देणे आणि पारशी युवक व कुटुंबांपर्यंत पोहोच वाढवण्याच्या प्रयत्नांचा समावेश होता.

समुदायाच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे महत्त्व सचिवांनी अधोरेखित केले. त्यांनी पारशी समुदायातील सदस्यांना, विशेषतः तरुण आणि महिलांना, स्टार्टअप्स, स्वयंरोजगार आणि कौशल्य-आधारित उपक्रमांसाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सवलतीच्या दरातील कर्ज आणि उद्योजकता मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

   

या बैठकीत 'जिओ पारसी' योजनेच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. पारशी समुदायाची घटती लोकसंख्या रोखण्याच्या उद्देशाने राबवली जाणारी ही एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्रीय  योजना आहे. ही योजना प्रजनन उपचार, बाल संगोपन मदत, पुरस्कार आणि जनजागृती कार्यक्रम तसेच कुटुंब निर्मिती आणि लोकसंख्या स्थिरीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी रचना केलेल्या समुदायांपर्यंत पोहोच निर्माण करणाऱ्या उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.

पारशी समुदायाचा समृद्ध वारसा, महत्त्वाच्या लोकसंख्याशास्त्रीय घटकांचे जतन करण्यासाठी आणि सामाजिक-आर्थिक कल्याण बळकट  करण्यासाठी, लक्ष्य केंद्रित उपक्रम आणि हितधारकांसोबत शाश्वत सहकार्याच्या प्रयत्नांच्या माध्यमातून भारत सरकारच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेची या चर्चेतून पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.

 

* * *

माधुरी पांगे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2233936) अभ्यागत कक्ष : 39