अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) आणि भारताच्या कायमस्वरूपी मिशनद्वारे जिनिव्हा येथील जागतिक व्यापार संघटनेत विशेष व्यापार सुविधा सत्रांचे आयोजन

Posted On: 26 FEB 2026 3:31PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026

भारत सरकारच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) जिनेव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेतील भारताच्या स्थायी मिशन बरोबर 24 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) व्यापार सुलभीकरणावरील समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर व्यापारावरील विशेष सत्रांचे आयोजन केले होते.

जिनिव्हा येथील जागतिक व्यापार संघटने मधील सीबीआयसी च्या सत्रात भारतीय शिष्टमंडळाचे विशेष सचिव आणि सीमाशुल्क विभागाचे सदस्य सुरजित भुजबळ यांनी भारतीय पथकाचे नेतृत्व केले. या कार्यक्रमात व्यापार सुविधा आणि क्षमता बांधणी या विषयावर केंद्रित दोन सत्रे झाली, ज्यामध्ये डब्ल्यूटीओ व्यापार सुविधा करारा (टीएफए) अंतर्गत भारताच्या परिवर्तनकारी सुधारणांवर प्रकाश टाकण्यात आला. जुलै 2026 मध्ये होणाऱ्या भारताच्या 8 व्या व्यापार धोरण पुनरावलोकनाच्या पार्श्वभूमीवरही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे 40 देशांच्या प्रतिनिधींसह जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य आणि सचिवालयाचा मोठा सहभाग दिसून आला. भारताचे अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींमध्ये असलेले स्वारस्य यामधून प्रदर्शित होते.

डब्ल्यूटीओ टीएफए वचनबद्धतेचे पालन साध्य केल्यानंतर, भारताने राष्ट्रीय व्यापार सुविधा कृती योजना (एनटीएफएपी 3.0) अंतर्गत "टीएफए प्लस" उपायांकडे वाटचाल केली आहे, किमान आवश्यकतांच्या पलीकडे जाऊन विकसित होणाऱ्या जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगतता आणणे, हे याचे उद्दिष्ट आहे. व्यापार सुलभीकरणावरील सत्रादरम्यान, भारतीय सीमाशुल्क शिष्टमंडळाने सीमाशुल्क सुधारणांमधील त्यांचा 'संपूर्ण-सरकार दृष्टिकोन' अधोरेखित केला आणि व्यापक डिजिटलायझेशन आणि प्रक्रिया पुनर्स्थापनेच्या माध्यमातून  फेसलेस, संपर्करहित आणि कागदरहित सीमाशुल्क परिसंस्था तयार करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली.

भारताने निर्धारित कालमर्यादेत टीएफए वचनबद्धता 100% अधिसूचित केली आहे.

ही प्रगती भारताची पुढील बाबींमधील शाश्वत वचनबद्धता दर्शवते:

  • पारदर्शकता वाढवणे
  • आंतर-संस्था समन्वय सुधारणे, आणि
  • सीमापार व्यापार प्रक्रिया सुलभ करणे

जागतिक व्यापार संघटना , जिनेव्हा येथील भारताचे  राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी डॉ. सेंथिल पांडियन यांनी सांगितले की, भारताने आपल्या व्यापार धोरणाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून व्यापार सुलभीकरण सुधारणांचा पाठपुरावा केला आहे. यूएनईएससीएपी जागतिक सर्वेक्षण 2023 अनुसार, भारताने एकूण व्यापार सुविधा अंमलबजावणीत 93 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असून, आशिया-प्रशांत क्षेत्रातील आघाडीच्या आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये स्थान मिळवले आहे.


सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2233060) अभ्यागत कक्ष : 12