पंतप्रधान कार्यालय
मुळांचे रक्षण करण्याचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर केले सामायिक
Posted On:
25 FEB 2026 8:43AM by PIB Mumbai
ज्ञान आणि दैनंदिन शिस्त ही पायाभूत मुळे सांभाळण्याचे निरतिशय महत्त्व स्पष्ट करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधानांनी प्रसिद्धी दिलेले सुभाषित पुढीलप्रमाणे आहे -
विप्रो वृक्षस्तस्य मूलं च सन्ध्या वेदाः शाखा धर्मकर्माणि पत्रम्।
तस्मान्मूलं यत्नतो रक्षणीयं छिन्ने मूले नैव शाखा न पत्रम्॥
"ज्ञानी मनुष्य एखाद्या वृक्षाप्रमाणे असतो. त्या ज्ञानवृक्षाचे मूळ म्हणजे दैनंदिन प्रार्थना. वेद म्हणजे त्याच्या शाखा (फांद्या) आणि सत्कर्मे ही त्याची पाने होत. म्हणून, मूळ काळजीपूर्वक जपले पाहिजे, कारण जर मुळाचाच विनाश झाला, तर फांद्याही तग धरू शकणार नाहीत नि पानेही जगणार नाहीत."
एक्स वर पंतप्रधान म्हणतात;
विप्रो वृक्षस्तस्य मूलं च सन्ध्या वेदाः शाखा धर्मकर्माणि पत्रम्।
तस्मान्मूलं यत्नतो रक्षणीयं छिन्ने मूले नैव शाखा न पत्रम्॥
***
NehaKulkarni / JaiWaishampayan / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232556)
अभ्यागत कक्ष : 100
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam