कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह उद्या - 23 फेब्रुवारी 2026 रोजी गुवाहाटी येथे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 58व्या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळा, बँकर जागरूकता कार्यक्रम आणि निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांच्या प्रदर्शनाचे करणार उद्घाटन

Posted On: 22 FEB 2026 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2026

 

माननीय पंतप्रधानांच्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी जीवन सुलभता वाढविण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगतपणे, भारत सरकारच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने निवृत्तीवेतन धोरणात आणि संबंधित प्रक्रियेच्या डिजिटायझेशनमध्ये अनेक प्रगत उपक्रम राबविले आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून, डॉ. जितेंद्र सिंह, माननीय राज्यमंत्री (कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन) उद्या- 23 फेब्रुवारी, 2026 रोजी आसाममधील अॅडमीनीस्ट्रेटीव्ह स्टाफ कॉलेज, गुवाहाटी येथे केंद्र सरकारचे विविध विभाग व मंत्रालयांच्या सहकार्याने आयोजित 58व्या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचे उद्घाटन करणार आहेत.

या कार्यशाळा भारत सरकारमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आयोजित केल्या जातात आणि निवृत्तीवेतनधारकांच्या जीवन जगण्यातील सुलभतेच्या दिशेने उचललेले हे एक ठोस पाऊल आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संक्रमण कालावधी सुरळीत व्हावा यासाठी निवृत्ती लाभ, सीजीएचएस, सायबर सुरक्षा, गुंतवणूक पर्याय, भविष्य पोर्टल, एकात्मिक निवृत्तीवेतनधारक पोर्टल, कुटुंब निवृत्तीवेतन, सीपीईएनजीआरएएमएस, अनुभव आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र इत्यादी विषयांवर विविध सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आसाम राज्यात सध्या कार्यरत आणि पुढील 12 महिन्यांत निवृत्त होणारे सुमारे 350 कर्मचारी या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे.

पीआरसी व्यतिरिक्त, विभागाच्या वतीने भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याने बँकर्स जागरूकता कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळांचा उद्देश केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित निवृत्तीवेतन नियम व प्रक्रियेबाबत निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.

58व्या पीआरसी कार्यशाळेदरम्यान निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात विविध बँक सक्रिय सहभाग नोंदवून निवृत्तीवेतनाशी संबंधित त्यांच्या उत्कृष्ट सेवा व उत्पादने सादर करतील. सहभागींसाठी निवृत्तीवेतनाशी संबंधित सर्व बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन खाते उघडण्याबाबत आणि त्यांच्या निवृत्ती निधीची योग्य योजनांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

 

* * *

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2231556) अभ्यागत कक्ष : 10