सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
भारत-ब्राझील दरम्यान एमएसएमई सहकार्य दृढ करण्यासाठी आणि हरित संक्रमणात प्रगतीसाठी सामंजस्य करार
राष्ट्राध्यक्ष लुला यांच्या भेटीत एमएसएमई सहकार्य आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी
प्रविष्टि तिथि:
21 FEB 2026 6:08PM by PIB Mumbai
ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या विद्यमान भारत भेटीत, भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाने 21.02.2026 रोजी ब्राझील प्रजासत्ताकाच्या उद्योजकता, सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील एमएसएमईंच्या परस्पर फायद्यासाठी सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. यामुळे दोन्ही देशांच्या एमएसएमईंना एकमेकांची बलस्थाने, बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि धोरणे समजून घेण्यासाठी चौकट आणि पूरक वातावरण तयार होणे शक्य होईल.
हरित संक्रमणाचे प्रयत्न आणखी पुढे नेण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश असून त्या अनुषंगाने एमएसएमई जागतिक बाजारपेठा आणि मूल्य साखळींशी अधिक जोडले जाऊन त्यांना हरित वित्तपुरवठा उपलब्ध होईल याची सोय करणे, उत्पादकता, स्पर्धात्मकता वाढावी तसेच शाश्वत विकासासाठी त्यांची क्षमता बळकट करण्याचाही करारात समावेश आहे.
***
शैलेश पाटील/ मंजिरी गानू /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2231375)
आगंतुक पटल : 63