पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पु वुंगझागिन वाल्टे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

Posted On: 21 FEB 2026 5:03PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पु वुंगझागिन वाल्टे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, मणिपूरमधील जनतेची उत्कृष्टरित्या सेवा केल्याबद्दल पु वुंगझागिन वाल्टे यांचे नाव स्मरणात राहतील. वाल्टे यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तसेच विधानसभेतील चर्चेत त्यांनी केलेले हस्तक्षेप नेहमीच विचार करण्यास भाग पाडणारे असत, असे त्यांनी म्हटले आहे.

एक्स समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात;

" पु वुंगझागिन वाल्टे यांनी मणिपूरच्या जनतेच्या सेवेसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल स्मरणात राहतील. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले. विधानसभेतील चर्चेत त्यांनी केलेले हस्तक्षेप नेहमीच विचार करण्यास चालना देणारे असत. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अनुयायांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो."

***

शैलेश पाटील/ मंजिरी गानू /परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2231338) अभ्यागत कक्ष : 11