इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये एआय स्केलिंगमध्ये ओपन नेटवर्क्स आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या भूमिकेवर तज्ञांनी केली चर्चा
आरोग्यसेवा, शेती आणि सार्वजनिक सेवांमध्ये एआय’चा वापर करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण
सर्वांना परवडणारे, वापरण्यास सोपे आणि बहुभाषिक एआय निर्मितीचे नेत्यांनी केले आवाहन
जागतिक स्तरावर प्रभावासाठी समावेशक आणि पुनरुत्पादित करता येण्याजोग्या एआय मॉडेल्सची आवश्यकता पॅनेलने केली अधोरेखित
Posted On:
20 FEB 2026 1:37PM by PIB Mumbai
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये "एआय आणि ओपन नेटवर्क्स: क्रिएटिंग इम्पॅक्ट ॲट स्केल" या सत्रात एक स्पष्ट प्रस्ताव मांडण्यात आला: एआयचे भविष्य केवळ मॉडेलमधील तांत्रिक प्रगतीवरच अवलंबून नाही तर हा नवोन्मेष लाखो लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि ओपन नेटवर्क आर्किटेक्चरही अवलंबून आहे. आरोग्यसेवा, शेती, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा वितरणातील उदाहरणे देऊन, वक्त्यांनी संमती-आधारित डेटा प्रणाली, परस्पर सुसंगत प्लॅटफॉर्म आणि मुक्त सहभाग यांचा संगम असलेला भारताचा दृष्टिकोन एआय’चा लोकसंख्या स्तरावर वापर करण्यासाठी मजबूत पाया तयार करतो आहे, हे दाखवून दिले.

या सत्रात नेटवर्क्स फॉर ह्युमॅनिटीचे सह-संस्थापक आणि संरक्षक नंदन नीलेकणी; बायोकॉन ग्रुपचे अध्यक्ष किरण मजुमदार-शॉ; वर्ल्ड बँक ग्रुपच्या डिजिटल आणि एआयचे उपाध्यक्ष संगबू किम; वाधवानी एआयचे संस्थापक सुनील वाधवानी; तसेच गुगल आणि अल्फाबेटचे अध्यक्ष जेम्स मन्यिका यांनी ओपन नेटवर्क्स आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांच्या माध्यमातून लोकसंख्या प्रमाणात एआय’चा व्यापक स्तरावर तैनाती कशी सक्षम करू शकतात यावर उच्चस्तरीय चर्चा केली. कमी खर्चातील कृषी सल्ला सेवा आणि एआय-सक्षम निदानांपासून ते प्रथिने संशोधन आणि फ्रंटलाइन सेवा साधने आणि अनुमान खर्च कमी करणे, एजंट-आधारित इंटरफेसद्वारे वापरकर्ता अनुभव सुलभ करणे तसेच बहुभाषिक उपलब्धता सक्षम करणे यावर भर देण्यात आला. त्यामुळे एआय ही केवळ तज्ञांची तंत्रज्ञान क्षमता न राहता सर्वसामान्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान बनू शकते याचे परीक्षण पॅनलने केले.
नेटवर्क्स फॉर ह्युमॅनिटीचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी उत्पादनक्षम एआय प्रसाराला गती देण्यासाठी ओपन नेटवर्क्सचे महत्त्व अधोरेखित केले. एआयला सामान्य-उद्देशीय तंत्रज्ञान म्हणून अधोरेखित करताना ते म्हणाले की, खरा प्रश्न हा आहे की "लोकांसाठी उत्पादनक्षम पद्धतीने त्याचा वापर प्रसारित करण्याचा सर्वात जलद मार्ग कोणता आहे?" यूपीआय च्या ओपन आर्किटेक्चरचा संदर्भ देत त्यांनी यावर भर दिला की "ओपन नेटवर्क्समुळे अनेक कर्त्यांना आणि नवोन्मेषकांना एआय वापरून अगदी सहज अनुप्रयोग तयार करता येतात.” तसेच त्यांनी सांगितले की "एजंटची खरी शक्ती म्हणजे वापरकर्त्यांना वाटणारी जटीलता दूर करणे."
बायोकॉन ग्रुपच्या अध्यक्ष किरण मजुमदार शॉ यांनी भारताच्या डिजिटल हेल्थ स्टॅक आणि एआय च्या संगमातून निर्माण होणाऱ्या परिवर्तनशील संधींवर भर दिला. भारताच्या जागतिक स्तरावर संदर्भ मॉडेल तयार करण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकताना, त्या म्हणाल्या की "आपण जोडत असलेल्या आरोग्य डेटाच्या आधारे याचा वापर करताना भारत त्वरित जागतिक संदर्भ मॉडेल तयार करू शकतो." अंतिम ध्येय म्हणजे "शाश्वत मार्गाने मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे" आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक बँक समूहाच्या डिजिटल आणि कृत्रिम प्रज्ञा शाखेचे उपाध्यक्ष सांगबू किम यांनी सर्व देशांमध्ये समानतेने वापरता येणाऱ्या आणि मोजमाप करता येणाऱ्या प्रारुपांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या जागतिक सानुकूलतेवर भर देताना, त्यांनी सांगितले की, "कोणत्या देशांमध्ये आणि सरकारांना कोणत्या घटकांच्या प्रतिकृती बनवता येतील आणि खरोखर महत्त्वाचे घटक कोणते आहेत यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे," याबाबत भारताचे उदाहरण आधीच अनेक देशांसमोर आहे,असे त्यांनी पुढे नमूद केले.
वाधवानी एआयचे संस्थापक सुनील वाधवानी यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या सामाजिक क्षेत्रात स्केलेबल एआय तैनात करण्यासाठी आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. "डीपीआय ज्या प्रकारचा डेटा आणि पाइपलाइन प्रदान करतो, त्याशिवाय तुम्ही सामाजिक क्षेत्रासाठी एआय तयार करू शकत नाही, तसेच अशा पायाभूत सुविधा, मोठ्या प्रमाणावर तैनात केल्याशिवाय,आपण आज ज्या पातळीवर पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत त्या पातळीवर कधीच पोहोचणार नाही."असे ही त्याच्या व्यावहारिकतेवर भर देत वाधवानी म्हणाले.
गुगल आणि अल्फाबेटमधील रिसर्च लॅब्स, टेक्नॉलॉजी अँड सोसायटीचे अध्यक्ष जेम्स मन्यिका यांनी व्यापक जागतिक नवोपक्रम संदर्भात ही चर्चा पुढे नेली. प्रवेशाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, "संधी उपलब्ध होण्यासाठी आणि सर्वत्र लोकांची नवोपक्रमातील क्षमता विकसित करण्यासाठी एआयमध्ये प्रवेश आवश्यक आहे," त्यांनी एआय विकासाच्या गतीचे वर्णन "समस्या सोडवण्याची आणि लोकांना सक्षम बनविण्याची ही एक असाधारण संधी आहे" अशा शब्दांत केले.
ओपन नेटवर्क्स आणि डीपीआय एकत्रितपणे एआय पायलटपासून ते लोकसंख्येच्या प्रमाणात तैनात करण्यापर्यंत आवश्यक असलेला संस्थात्मक आणि तांत्रिक पाया तयार करते,असा निष्कर्ष या सत्राच्या अखेरीस काढण्यात आला.कमी किंमत, बहुभाषिक प्रवेश आणि प्लग-अँड-प्ले इनोव्हेशन फ्रेमवर्क एकत्र करून, विविध देश अशा प्रणाली तयार करू शकतात ज्या केवळ विशिष्ट प्रदेशात वापरता येतील असे नाही तर जगभरात त्यांच्या प्रतिकृती बनवता येतील,
ज्यामुळे एआय केंद्रित लाभापुरती मर्यादित न रहाता सामायिक विकास क्षमतेत बदलेल.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2230846)
अभ्यागत कक्ष : 18