नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘’इंडिया एआय इम्पॅक्ट’’ शिखर परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या दालनाला दिली भेट
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या दालनामध्ये कृत्रिम प्रज्ञा-चलित नवीकरणीय ऊर्जा एकीकरणावर टाकला प्रकाश
Posted On:
18 FEB 2026 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
केंद्रीय नूत आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी आज भारत मंडपम, कक्ष क्रमांक 14 येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेमधील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए)च्या दालनाला भेट दिली. यावेळी त्यांनी उर्जेसाठी कृत्रिम प्रज्ञेवरील जागतिक मोहिमेला पुढे नेणाऱ्या तंत्रज्ञानातील नवकल्पनांच्या मालिकेचा आढावा घेतला.

या दालनामध्ये व्यावहारिक, वापरता येण्यायोग्य मॉडेल्सवर प्रकाश टाकला आहे; कृत्रिम प्रज्ञा (एआय), डिजिटल प्लॅटफॉर्म आणि भू-स्थानिक साधनांची उपयुक्तता वाढवणे आणि आधुनिकीकरण करणे शक्य आहे. यामुळे अक्षय ऊर्जा एकत्रीकरणाला गती देता येऊ शकते आणि ‘आयएसए’ म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सदस्य देशांमध्ये ऊर्जा लवचिकता कशी मजबूत करू शकेल, हे दर्शविले आहे.
‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषदेने सौर तैनाती आणि डिजिटल बुद्धिमत्तेमध्ये अभिसरण चालविण्यासाठी, वास्तविक वेळेला जास्तीत जास्त अचूक आणि स्मार्ट ‘ग्रिड’ व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून ‘एआय फॉर एनर्जी’ वरील ग्लोबल मिशनवर प्रकाश टाकला.
ऊर्जा संक्रमणापासून ‘ग्रिड’ संक्रमणापर्यंत
वितरित नवीकरणीय ऊर्जा वेगाने विस्तारत असताना, लक्ष केंद्रित करणे केवळ क्षमता वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करून लाखो विकेंद्रित मालमत्तांना स्थिर, विश्वासार्ह ‘ग्रिड’मध्ये एकत्रित करण्यावर केंद्रित केले जात आहे. यासाठी रोहित्रांच्या माध्यमातून मजबूत पायाभूत सुविधा, आधुनिक वितरणाचे जाळे निर्माण करणे आणि वास्तविक वेळेला निरीक्षण प्रणाली कार्यरत ठेवणे आवश्यक आहेत.

यावेळी मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नमूद केले की, ऊर्जा संक्रमण आणि ‘ग्रिड’ संक्रमण यांचा एकमेकांमध्ये मेळ बसला पाहिजे. डेटा-चालित अंदाज आणि प्रत्यक्ष वेळेला काय घडते, याच्या कमाल शक्यता लक्षात घेऊन लवचिक, डिजिटल, बुद्धिमान ग्रिड तयार केले पाहिजेत.
दिल्ली, राजस्थान आणि आंध्र प्रदेश सारखी राज्ये डिजिटायझेशन, स्मार्ट मीटरिंग आणि डिजिटल नियंत्रण प्रणालींमध्ये प्रगती करत आहेत. त्यामुळे वीज गळतीतून नुकसान कमी होत आहे आणि उच्च नवीकरणीय प्रवेश सक्षम होत आहेत. हे अनुभव त्यांच्या वीज क्षेत्रांचे आधुनिकीकरण करू इच्छिणाऱ्या विकसनशील राष्ट्रांसाठी मौल्यवान धडे ठरत आहेत.
लवचिक आणि समावेशक ऊर्जा भविष्यासाठी कृत्रिम प्रज्ञा
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमधील 125 सदस्य देश आणि स्वाक्षरी करणाऱ्या देशांसह, व्यावहारिक आणि प्रत्यक्ष राबविणे शक्य असलेल्या उपायांचे प्रमाण वाढवण्यासाठी, या आघाडीने एक जागतिक व्यासपीठ प्रदान केले आहे. उर्जेसाठी एआयवरील वैश्विक मिशनद्वारे, ‘आयएसए’- सौर ऊर्जा आणि डिजिटल बुद्धिमत्ता यांच्यामुळे संकरित- मिश्र ऊर्जेचे प्रमाण वाढत आहे.
कृत्रिम प्रज्ञेव्दारे क्षमतेचे पूर्वानुमान, पूर्व सूचनेनुसार देखभाल, कमाल ऊर्जा निर्मिती आणि नवीकरणीय एकत्रीकरण, कार्यक्षमता, परवडणारी क्षमता आणि लवचिकता यांच्यामध्ये लक्षणीय सुधारणा घडू शकते.
यावेळी बोलताना मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारताचे सौर यश यावर भर दिला. ते म्हणाले की, केवळ मेगावॉट वीज निर्माण करणे हा मुद्दा नाही; तर नागरिकांना सक्षम बनवणे, शेतकऱ्यांना पाठिंबा देणे, उपयुक्तता मजबूत करणे आणि लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, या गोष्टी महत्वाच्या आहेत.
यावेळी सादर केलेल्या प्रमुख नवकल्पनांमध्ये पुढील गोष्टींचा समाविष्ट होता:
डिजिटल कंझ्युमर इंटरफेस - वन सोलर अॅप
बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेडने विकसित केलेले, युनिफाइड "वन सोलर अॅप"व्दारे डिजिटल नोंदणी, पारदर्शक नेट-मीटरिंग प्रक्रिया, कामगिरीचे अवलोकन, पाहणी करणे आणि एकात्मिक सेवा वितरणाद्वारे छतावरील सौर अवलंबनाला सुव्यवस्थित करते. वितरण उपयुक्ततांसाठी व्यावहारिक पारदर्शकता सुधारताना या मंचामुळे ग्राहकांची सोय वाढणार आहे.
डिस्कॉमसाठी डिजिटल ट्वीन्स सोल्युशन्स
भारतीय स्टार्टअप्स रिअल-टाइम सिम्युलेशन, रिन्युएबल इंटिग्रेशन मॉडेलिंग, पूर्वसूचना देखभाल प्रणाली आणि परिस्थिती-आधारित नियोजन सक्षम करण्यासाठी ‘डिजिटल ट्वीन्स’ - वीज वितरण नेटवर्कच्या आभासी प्रतिकृती – जारी केल्या आहेत. हे उपाय तांत्रिक नुकसान आणि गुंतवणूक जोखीम कमी करताना व्यावहारिक कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणतात.
जीआयएस-आधारित वितरण आधुनिकीकरण
आंध्र प्रदेश ईस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडने हाती घेतलेल्या उपक्रमांसह भू-स्थानिक मॅपिंग उपक्रम, मालमत्ता-स्तरीय दृश्यमानता आणि कमाल पायाभूत सुविधा प्रदान करतात. जीआयएस-सक्षम नियोजन ‘आउटेज’ व्यवस्थापन, भांडवल वाटप आणि उच्च अक्षय ऊर्जा प्रवेशासाठी तयारी मजबूत करते.
* * *
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229950)
अभ्यागत कक्ष : 10