गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे महाराष्ट्र समाज गांधीनगरने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे केले अनावरण
गुलामगिरीच्या दाट अंधारात, वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षीछत्रपती शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करण्याचा दृढ संकल्प केला
देशातील तीर्थस्थळे आणिमंदिरांचे रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना संदेशदिला की मंदिरे पाडून सनातन धर्म संपणार नाही
नरेंद्रमोदी यांनी आक्रमणकर्त्यांनी नुकसान केलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि सोमनाथमंदिराचा जीर्णोद्धार केला
Posted On:
17 FEB 2026 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे महाराष्ट्र समाज गांधीनगरने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, 'हिंदवी स्वराज्य'चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण येथे झाले आहे ही संपूर्ण गांधीनगरसाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.ते म्हणाले की, जवळपास 21 फूट उंचीचा हा पुतळा गांधीनगरमधील रहिवाशांना, विशेषतः तरुणांना पुढील अनेक वर्षे प्रेरणा देत राहील. अमित शाह म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे कर्तृत्व कधीही अप्रासंगिक होणार नाहीत. अनेक पिढ्यांपर्यंत, राष्ट्र त्यांच्या अतुलनीय योगदानाचे ऋणी राहील.

अमित शाह म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर संघर्षाचा मार्ग कधीही सोडला नाही. औरंगजेबाने त्यांचा निर्धार मोडून काढण्यासाठी संपूर्ण मुघल साम्राज्य तैनात केले, परंतु शिवाजी महाराज कधीही मागे हटले नाहीत. स्वातंत्र्यलढा कमकुवत करण्यासाठी काशी आणि मथुरा येथील मंदिरे पाडण्यात आली तेव्हा शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडील मंदिरांचे रक्षण केले आणि सप्तकोटेश्वर मंदिर पुन्हा विधिवत स्थापन केले . ते म्हणाले, देशातील तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांचे रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना संदेश दिला की मंदिरे पाडून सनातन धर्म संपणार नाही. ते म्हणाले की, आक्रमणकर्त्यांनी नुकसान केलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि सोमनाथ मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम नरेंद्र मोदी यांनी हाती घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम नौदल स्थापन केले आणि घोषणा केली, “ज्याचे आरमार, त्याचा समुद्र” - म्हणजे, “ज्याच्याकडे नौदल आहे त्याचे समुद्रावर नियंत्रण आहे. .” ते म्हणाले की, मोदी सरकारने भारतीय नौदलाच्या ध्वजातून वसाहतवादी चिन्हे काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा सन्मान केला आहे. अमित शहा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय भाषांच्या उत्थानासाठीही काम केले. सत्तेत आल्यानंतर त्यांनी प्रशासनात मराठी आणि संस्कृतला प्रोत्साहन दिले. आज, शिवाजी महाराजांच्या संस्कारांवर चालत हाच भारत जगासमोर तेजस्वी आणि प्रकाशमान स्वरूपात उभा आहे.

* * *
नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229441)
अभ्यागत कक्ष : 20