पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या दालनाचे उदघाटन


पंचायत राज मंत्रालयाने इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये तळाच्या स्तरापासून प्रशासन मजबूत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला अधोरेखित

Posted On: 17 FEB 2026 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026

केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित इंडिया एआय शिखर परिषद 2026 मध्ये पंचायती राज मंत्रालयाच्या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री  सम्राट चौधरी, बिहार सरकारचे उद्योग आणि रस्ते बांधकाम मंत्री डॉ. दिलीप कुमार जयस्वाल, बिहार सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि क्रीडा मंत्री  श्रेयसी सिंह, राज्यसभा खासदार संजय कुमार झा आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंचायती राज मंत्रालयाच्या दालनात तळाच्या  स्तरावर प्रशासनाची पकड मजबूत करण्याच्या उद्देशाने पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी मंत्रालयाने विकसित केलेल्या ए आय आधारित प्लॅटफॉर्म्सचे सादरीकरण करण्यात आले.इंडिया एआय इम्पॅक्ट एआय शिखर परिषद  आणि एक्स्पो 2026 दरम्यान सभासार, प्रमाण आणि ईग्रामसाथी यांचे थेट प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.

यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरले ते सरपंच की चौपाल, एआय का कमाल या लोकनाट्याचे सादरीकरण.  शिखर परिषदेत सादर करण्यात आलेल्या या नाटकात कृत्रिम बुद्धिमत्ता संरचित दस्तऐवजीकरण आणि पारदर्शक प्रक्रियांद्वारे ग्रामसभेचे कामकाज कशाप्रकारे  बळकट करू शकते हे दाखवले आहे. "सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय" या शिखर परिषदेच्या संकल्पनेवर आधारित मंत्रालयाच्या हस्तक्षेपांचा भर ग्रामसभेच्या कार्यवाहीची विश्वासार्ह डिजिटल नोंद प्रणालीबद्ध करण्यावर, मालमत्ता निरीक्षणात प्रामाणिकता सुनिश्चित करण्यावर आणि रिअल-टाइम प्रशासनिक सहाय्य सक्षम करण्यावर आहे.

‘सभासार’ हे एआयवर आधारित साधन असून ते  ग्रामसभेच्या बैठकीचे ध्वनिमुद्रण करते, त्याचे लेखी रूपांतर करते आणि स्थानिक भाषेत बैठकीचे मुद्देसूद इतिवृत्त  आपोआप तयार करते. तर ‘प्रमाण’ ‘ हे विविध शासकीय योजनांअंतर्गत घेतलेल्या मालमत्तेच्या छायाचित्रांची तपासणी करण्यासाठी इमेज अ‍ॅनालिटिक्सचा वापर करते. यामुळे फोटोची स्वयंचलित पडताळणी आणि गुणवत्ता तपासणी केली जाते. ‘ई ग्राम साथी’ हे एआयवर आधारित साधन असून, ते पंचायत प्रतिनिधी आणि नागरिकांना माहिती प्रदान करते. हे तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम  डिजिटल नवोन्मेषाच्या  साहाय्याने लोकसहभाग अधिक मजबूत करण्याच्या आणि देशभरातील शेवटच्या टप्प्यापर्यंत  प्रशासन बळकट करण्याच्या  पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत.

अभ्यागतांना भारत मंडपम येथे 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत पंचायत राज मंत्रालयाच्या दालनाला (हॉल 5, बूथ 5F5 आणि 5F9) येथे भेट देता येईल. दालनामध्ये “बी द सरपंच” हा प्रत्यक्ष अनुभव देणारा संवादात्मक  सिम्युलेशन उपक्रम सादर केला असून यात पारंपरिक नुक्कड नाटकाच्या माध्यमातून एआय-सक्षम निर्णय नोंदवही कशी केली जाते, हे दाखवले जाते. तसेच मंत्रालयाच्या एआय प्लॅटफॉर्मचे  मार्गदर्शनासह प्रात्यक्षिक दाखवले जाते.

निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/‍प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2229351) अभ्यागत कक्ष : 11