इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ग्राहक ते जागतिक एआय निर्माता बनण्याच्या भारताच्या प्रवासात सार्वभौम एआयची महत्वपूर्ण भूमिका
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये "भारताच्या सार्वभौम एआय आणि डेटाचा व्यापक प्रभाव " या विषयावरील सत्रात जागतिक एआय नेतृत्वाच्या दिशेने मार्गांचा घेण्यात आला शोध
Posted On:
17 FEB 2026 8:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये "भारताच्या सार्वभौम एआय आणि डेटाचा व्यापक प्रभाव "या शीर्षकाच्या सत्रात प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा ग्राहक ते जागतिक महत्वाच्या एआय प्रणालीचा निर्माता बनण्याकडे भारत कशा प्रकारे वाटचाल करू शकतो यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या चर्चेत सखोल संशोधनातील प्रतिभा आणि दीर्घकालीन नवोन्मेषी गुंतवणुकीतील त्रुटी दूर करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. खरी एआय क्षमता अल्पकालीन हस्तक्षेपांऐवजी शाश्वत संशोधन परिसंस्था आणि मजबूत मार्गदर्शनाद्वारे निर्माण होते यावर पॅनेलने भर दिला . वक्त्यांनी एआय सार्वभौमत्वाचे तीन प्रमुख स्तंभ अधोरेखित केले: भारतीय भाषा आणि सामाजिक संदर्भांना अनुकूल स्वदेशी मॉडेल्सचा विकास; लवचिक देशांतर्गत पायाभूत सुविधांची निर्मिती; आणि पायाभूत संशोधनाचे बळकटीकरण.
या सत्रात प्रगत एआय संशोधनाला आर्थिक समावेशकता , शेती, आरोग्यसेवा आणि शिक्षण यासारख्या राष्ट्रीय प्राधान्यांशी जोडले गेले. अर्थपूर्ण आणि समावेशक परिणाम प्राप्त करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला भारताच्या विकास उद्दिष्टांशी संरेखित केले पाहिजे असे वक्त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) चे महासंचालक आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह यांनी सांगितले की सार्वभौम एआय म्हणजे विकेंद्रित होऊन काम करणे नाही. ते म्हणाले की सार्वभौम एआय म्हणजे एआय प्रणालीचे डिझाइन , वापर आणि संचालनावर नियंत्रण असणे आहे. एआयचा वापर आरोग्यसेवा, शिक्षण, शेती आणि आर्थिक समावेशनातील वास्तविक आव्हाने सोडवण्यासाठी केला पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये सेवा मिळू शकतील आणि त्यांचे जीवनमान सुधारू शकेल यावर त्यांनी भर दिला .
भारतजेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी बाल म्हणाले की, एआयचा अवलंब सर्व क्षेत्रांमध्ये केला जाईल मात्र त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने आणि काळजीपूर्वक व्हायला पाहिजे, ज्याची सुरुवात शासन, नागरिक सेवा आणि वित्त यासारख्या प्राधान्य आणि संवेदनशील क्षेत्रांपासून झाली पाहिजे. त्यांनी सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामध्ये सामान्य मॉडेल्स, अनुमान आर्किटेक्चर आणि नवोन्मेषकांना जलद आणि सुरक्षित उपाय तयार करण्यास सक्षम करणारे घटक समाविष्ट आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) माहिती प्रणाली आणि व्यवस्थापन संचालनालय (डीआयएसएम) संचालक राजीव रतन चेतवानी यांनी एआयचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. धोरणात्मक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या एआय प्रणाली थेट इंटरनेट अवलंबित्वाशिवाय ऑफलाइन परिचालित केल्या पाहिजेत आणि पारदर्शक आणि ऑडिट करण्यायोग्य असाव्यात यावर त्यांनी भर दिला . त्यांनी राष्ट्रीय कायदेशीर चौकटींशी जुळवून घेण्यायोग्य मॉडेल्स, स्पष्ट डेटा वंश आणि प्रशिक्षण पाइपलाइनची आवश्यकता अधोरेखित केली. भारताच्या विशाल भू-स्थानिक डेटा संसाधनांचा एआयद्वारे वापर शेती, आपत्ती व्यवस्थापन, हवामान अंदाज आणि शहरी नियोजन मजबूत करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे सुरक्षा आणि सामाजिक दोन्ही लाभ मिळतील असे ते म्हणाले.
या चर्चेतून नवोन्मेषाला समर्थन देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना चालना देण्यासाठी दीर्घकालीन क्षमता निर्माण करण्यासाठी सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित झाली.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229336)
अभ्यागत कक्ष : 11