पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नवी दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे केले उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 16 FEB 2026 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम् येथे इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे उद्घाटन केले. 

नवोन्मेषकर्ते, संशोधक आणि तंत्रज्ञानप्रेमी यांच्यासोबतची ही उपस्थिती कृत्रिम बुद्धिमत्ता, भारतीय प्रतिभा आणि नवोन्मेषाची असाधारण क्षमता अधोरेखित करत आहे. एआयमधील भारताची प्रगती ही केवळ परिवर्तनकारक उपाययोजनांनाच आकार देणार नाही तर जागतिक प्रगतीमध्येही योगदान देईल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

एक्सवरील एका पोस्टमध्ये  मोदी म्हणालेः

“भारत मंडपम् येथे इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे उद्घाटन केले. नवोन्मेषकर्ते, संशोधक आणि तंत्रज्ञानप्रेमी यांच्यासोबत येथे उपस्थित राहताना कृत्रिम बुद्धिमत्ता, भारतीय प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या असाधारण क्षमतेचे दर्शन घडवत आहे. एकत्रितपणे आपण केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी समस्यांवरील उपाययोजनांना प्रत्यक्षात साकार करू!”

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2228907) आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada