माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 मध्ये वेव्ह्ज क्रिएटर्स कॉर्नर विभागात 51 स्टार्टअप्स करणार कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेषाचे सादरीकरण
वेव्ह्ज क्रिएटर्स कॉर्नर विभागात भारताच्या पुढील पिढीतील माध्यम तंत्रज्ञान नवोन्मेषकांवर असेल प्रकाशझोत
Posted On:
16 FEB 2026 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
भारताच्या उदयोन्मुख माध्यम आणि मनोरंजन नवोन्मेष परिसंस्थेला मोठी चालना देण्यासाठी AVGC-XR (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी) क्षेत्र आणि माध्यम तंत्रज्ञान क्षेत्रातील 51 आश्वासक स्टार्टअप्स भारत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदर्शन 2026 दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे समर्थित वेव्ह्ज क्रिएटर्स कॉर्नर मध्ये नवोन्मेषी उत्पादनांचे आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत. हे प्रदर्शन 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारत मंडपम येथे आयोजित केले आहे.

भारताच्या नवोन्मेष-चालित सर्जनशील अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या वेव्हएक्सच्या पाठिंब्यामुळे या स्टार्टअप्सचा सहभाग सुलभ झाला आहे. वेव्ह्ज क्रिएटर्स कॉर्नर स्टार्टअप्स साठी त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजनांचे सादरीकरण, सखोल कथाकथन पद्धती, गेमिंग क्षेत्रातील नवोन्मेष, आभासी उत्पादन साधने आणि पुढील पिढीतील आशयविषयक तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील नेते, नवोन्मेषक, धोरणकर्ते आणि जागतिक स्तरावरील भागधारकांपर्यंत पोहोचण्याचे एक गतिशील व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे.
काळजीपूर्वक निवडलेले सहभागी गट भारताच्या वेगाने वाढणाऱ्या AVGC‑XR (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी) क्षेत्रातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करतात. कृत्रिम बुद्धिमत्ता -सक्षम अॅनिमेशन पाइपलाइन आणि रिअल-टाइम रेंडरिंग इंजिनपासून ते इमर्सिव्ह एक्सआर अनुभव आणि गेमिफाइड लर्निंग प्लॅटफॉर्मपर्यंत, प्रदर्शन करणारे स्टार्टअप्स आशय निर्मिती, वितरण आणि प्रेक्षकांशी संवाद या क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणत आहे.

भारत कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद 2026 मधील वेव्ह्ज क्रिएटर्स कॉर्नर मध्ये भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठीच्या कल्पना याविषयावरील भविष्यवेधी सादरीकरण होणार असून यामध्ये माध्यम क्षेत्रातील नवोन्मेष आणि येणाऱ्या अभ्यागतांचा मेळ घातला जाईल. स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान विकासक "झिरो-टच ऑटोनॉमस न्यूजरूम" सादर करत आहेत. ही एक अभूतपूर्व प्रणाली आहे ज्यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट कार्यक्रम फीड्सचा स्वीकार केला जातो आणि हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेतील बहुभाषिक "ब्रेकिंग न्यूज" बुलेटिनमध्ये रूपांतरित होतात.
व्हॉईस कमांड किंवा स्वर संगम वापरुन स्तुतीगीताला काही सेकंदात प्रसारण क्षमतेचा स्वरसाज चढवता येईल. याशिवाय अतिरिक्त महत्वाच्या बाबी म्हणजे रिअल टाईम बहुभाषिक मुलाखती, कृत्रिम बुद्धीमत्तेचा मानवी रुप धारण केलेला यंत्रमानव आणि जिथे बोलणारा स्वतःला वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये ऐकू शकेल असे व्हॉईस क्लोनिंग स्टेशन या साठी असलेला पॉडकास्ट स्टुडियो.

याशिवाय, भाषासेतू आणि कलासेतू आव्हाने या उपक्रमाचे विजेते स्टार्टअप्स प्रदर्शनात भाग घेतील आणि त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करतील.
वेव्हएक्स संबधी
वेव्हएक्स हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह्ज उपक्रमातील स्टार्टप्सना वेग देणारा (अॅक्सलरेटर) मंच आहे. हा मंच खास करुन माध्यमे,करमणूक तसेच भाषासंबधी तंत्रज्ञान परिसंस्थेत नवोन्मेशाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. भारताच्या अत्याधुनिक सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्सना सहाय्य देण्यासाठी निर्माण केलेला वेव्ह-एक्स हा मंच संशोधक, सरकारी संस्था आणि औद्योगिक नेतृत्व यांच्यामधला सेतू म्हणून काम करतो. हॅकेथॉन, संरचित इन्क्युबेशन उपक्रम, मेंटरशीप आणि राष्ट्रीय मंचाबरोबर सहयोग या माध्यमातून नवनवीन संकल्पनांना वेव्ह एक्स सहाय्य करतो. मजबूत आणि अखंड इनक्यूबेशन संरचना उभी करण्यासाठी वेव्ह-एक्सने टी-हब हैदराबाद आणि हैदराबाद, आणि आयआयटी दिल्ली यांच्याशी भागीदारी केली आहे. आयआयसीटी मुंबई, एफटीआयआय पुणे, एसआरएफटीआय कोलकाता, आयआयएमसी दिल्ली, आयआयएमसी आयझॉल, आयआयएमसी अमरावती, आयआयएमसी ढेंकनाल, आयआयएमसी कोट्टायम आणि आयआयएमसी जम्मू अशा भारतातील 9 इन्क्यूबेटर केंद्रांमध्ये हे कार्यरत आहे.
* * *
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228875)
अभ्यागत कक्ष : 20