महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेवर(एसएचई-बॉक्स)  महिला व बाल विकास मंत्रालयाकडून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन


केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी एसएचई-बॉक्स लोगो, पीओएसएच स्वैच्छिक अनुपालन तपासणी यादी, मिशन शक्ती अ‍ॅपशी एसएचई-बॉक्सचे एकत्रीकरण आणि कर्मयोगी भारत पीओएसएच प्रशिक्षण लिंक एसएचई-बॉक्स पोर्टलवर सुरू केली

राष्ट्रीय कार्यस्थळ सुरक्षितता प्रतिज्ञा देण्यात आली

देशभरातील कार्यस्थळांवर महिलांसाठी सुरक्षितता आणि सन्मानाची संस्कृती रुजवणे हा उपक्रमाचा उद्देश

Posted On: 14 FEB 2026 5:04PM by PIB Mumbai

 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने ने आज 14 फेब्रुवारी 2026 नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कार्यस्थळी महिलांची सुरक्षितता (एसएचई-बॉक्स) या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले.

ही परिषद महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी; महिला व बाल विकास राज्यमंत्री सवित्री ठाकूर; तसेच खासदार सुधांशु त्रिवेदी, रेखा शर्मा, लव्हली आनंद आणि शोभनाबेन महेंद्रसिंह बरैया यांच्या उपस्थितीत पार पडली.

6933fac2f248893999ffc5343a287f02.jpg

उद्घाटन सत्रात अन्नपूर्णा देवी यांनी एसएचई-बॉक्स लोगो, पीओएसएच स्वैच्छिक अनुपालन तपासणी यादी, मिशन शक्ती अ‍ॅपशी एसएचई-बॉक्सचे एकत्रीकरण आणि कर्मयोगी भारत पीओएसएच प्रशिक्षण लिंक एसएचई-बॉक्स पोर्टलवर सुरू केली. त्यांनी राष्ट्रीय कार्यस्थळ सुरक्षितता प्रतिज्ञा देखील दिली, ज्यामुळे देशभरातील महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्य करण्याविषयक कार्यस्थळांबाबतची सामूहिक बांधिलकी अधोरेखित झाली.

मुख्य भाषणात अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले की कार्यस्थळी महिलांची सुरक्षितता ही केवळ कायदेशीर गरज नाही, तर न्याय आणि समतेबाबत देशाची बांधिलकी दर्शवते. एसएचई-बॉक्स पोर्टलवर 1.48 लाखांहून अधिक संस्था नोंदणीकृत असून 60,000 पेक्षा जास्त अंतर्गत समित्या सक्रीय आहेत, तसेच मागील 6 वर्षांत महिला कामगार सहभाग 23 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, यामुळे जबाबदारी आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे भारत निर्णायक वळण घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. 5 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या ऐतिहासिक जेंडर बजेट वाटपाचा उल्लेख करत त्यांनी ‘विकसित भारत 2047’ च्या दृष्टिकोनात महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमीकरण केंद्रस्थानी असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. खरा विकसित भारत तोच असेल, जिथे प्रत्येक महिला भीतीशिवाय काम करू शकेल आणि नेतृत्व करू शकेल.

f2ebc00504c3a3e1a11876410a4064a1.jpg

राष्ट्रीय स्तरावरील पीओएसएच प्रशिक्षण व्हिडिओही दाखवण्यात आला. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सुरक्षित कार्यस्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कामगार संहितांची भूमिका स्पष्ट केली.

c9ebdabc8ba4116ab20f876082df0fc2.jpg

“अनुपालन बळकट करणे आणि सुरक्षित कार्यस्थळ संस्कृती निर्माण करणे” या विषयावर झालेल्या चर्चेत महिला व बाल विकास मंत्रालय, संसद, सर्वोच्च न्यायालय, संयुक्त राष्ट्र संघ महिला विभाग, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ, जागतिक बँक यांचे प्रतिनिधी तसेच कार्यस्थळ सुरक्षितता आणि लैंगिक हक्क क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले.

या चर्चेत संस्थात्मक जबाबदारी मजबूत करणे, जागतिक सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आणि संघटित तसेच असंघटित क्षेत्रांमध्ये अनुपालन यंत्रणा बळकट करून अधिक सुरक्षित आणि समावेशक कार्यस्थळे निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

या परिषदेत सरकारी व खासगी क्षेत्रांतील 160 हून अधिक संस्थांमधील सुमारे 1,500 सहभागी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर थेट वेबकास्टद्वारे 40,000 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले, ज्यामुळे या कार्यक्रमाची व्यापक पोहोच सुनिश्चित झाली.

896ca9c522fcc6311b4b1ce624d6f66d.jpg

हा उपक्रम पीओएसएच तरतुदींविषयी जागरूकता वाढवणे, अनुपालन मजबूत करणे, एसएचई-बॉक्सचा वापर वाढवणे आणि देशभरातील कार्यस्थळांवर महिलांसाठी सुरक्षितता व सन्मानाची संस्कृती रुजवणे या उद्देशाने राबवला जात आहे.

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2228249) अभ्यागत कक्ष : 9