आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शैक्षणिक वर्ष 2020-21 ते 2025-26 दरम्यान वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी  48,563 जागा; तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 29,080  जागा  वाढल्या  : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग

Posted On: 13 FEB 2026 1:37PM by PIB Mumbai

 

आर्थिक वर्ष 2025-26 ते 2028-29 या कालावधीत केंद्र सरकारच्या योजनांतर्गत वैद्यकीय अभ्यासक्रम शाखांसाठी 10,023 अतिरिक्त जागांना सरकारची मंजूरी दिली आहे. याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) दिलेल्या माहितीनुसार देशात शैक्षणिक वर्ष 2020-21 ते 2025-26 या काळात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये  48,563 ने वाढ झाली आहे. वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशवाढीचे तपशील परिशिष्टात दिले आहेत. याशिवाय केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 ते 2028-29 या कालावधीसाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये आणखी 10,023 प्रवेशांना मंजूरी देण्यात आली आहे.

वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा कायम राखण्याची जबाबदारी असलेल्या ‘एनएमसी’  या सर्वोच्च नियामक मंडळाने विविध नियम जारी केले आहेत. किमान मानक आवश्यकता (एमएसआर), वैद्यकीय पदवी शिक्षण नियम (जीएमइआर) 2023, वैद्यकीय शिक्षण मानक व्यवस्थापन नियम (एमएसएमइआर) 2023 आणि स्पर्धात्मकता आधारित वैद्यकीय शिक्षण (सीबीएमइ) अभ्यासक्रम मार्गदर्शक सूचना 2024 या नियमावली वैद्यकीय शिक्षणातील पूर्वसूचित मानकांचे पालन होत आहे.  देशभरातील वैद्यकीय शिक्षण आणि  प्रशिक्षण यांचा दर्जा तसेच त्यामध्‍ये  एकसमानता  राखण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.     

Annexure

 

Number of MBBS seats from academic year 2020-21 to 2025-26

Sr. No.

Academic Year

Increase in MBBS seats

1

2020-21

2963

2

2021-22

8790

3

2022-23

7398

4

2023-24

9652

5

2024-25

8641

6

2025-26

11119

 

 

Number of PG seats from academic year 2020-21 to 2025-26     

Sr. No.

Academic Year

Increase in PG seats

1

2020-21

4983

2

2021-22

4705

3

2022-23

2874

4

2023-24

4713

5

2024-25

4186

6

2025-26

7619

 

***

सुवर्णा बेडेकर/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227530) अभ्यागत कक्ष : 17