संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर भारत : संरक्षण मंत्रालयाने भारतीय बनावटीच्या अर्थात खरेदी (भारतीय) श्रेणीअंतर्गत आठ डॉर्नियर 228 विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत केला 2,312 कोटी रुपयांचा करार

Posted On: 12 FEB 2026 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी कार्यान्वयनासाठीच्या उपकरणांसह (Operational Role Equipment) आठ डॉर्नियर 228 विमाने खरेदी करण्याकरता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, परिवहन विमान विभाग, कानपूर यांच्यासोबत करारावर स्वाक्षरी केली आहे.  यासाठी 2,312 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. भारतीय बनावटीच्या अर्थात खरेदी (भारतीय) [Buy (Indian)] या श्रेणीअंतर्गत हा खर्च केला जाईल. 12 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली इथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झाला.

या कार्यक्रमामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या उत्पादन परिसंस्थेला बळकटी मिळेल, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि पूरक उद्योगांच्या विस्तृत व्यवस्थेलाही पाठबळ मिळणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच या करारामुळे देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) तसेच संबंधित उपकरणांच्या आयुष्यभराच्या तंत्रज्ञानविषयक पाठबळासंबंधीच्या शाश्वत संधीही निर्माण होऊ शकतील.

या करारातून भारताची सागरी सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासोबतच, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाप्रति सरकारची वचनबद्धताही पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227146) अभ्यागत कक्ष : 18