संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाने प्रथमच संयुक्त कृती दल (सीटीएफ) 154 चे नेतृत्व स्वीकारले
Posted On:
12 FEB 2026 10:39AM by PIB Mumbai
हिंद महासागर क्षेत्र आणि त्याही पलीकडे, सहयोगी सागरी सुरक्षा आणि क्षमता निर्मितीच्यादृष्टीने भारताची वचनबद्धता अधोरेखित करणारी एक ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय नौदलाने संयुक्त सागरी दलाअंतर्गत प्रमुख बहुराष्ट्रीय प्रशिक्षण कृती दल म्हणून परिचित असलेल्या संयुक्त कृती दल (सीटीएफ) 154 चे नेतृत्व प्रथमच स्वीकारले आहे.
बहरीनमधील मनामा येथील सीएमएफ मुख्यालयात 11 फेब्रुवारी 2026 रोजी कमांड बदल समारंभ पार पडला. या समारंभाचे अध्यक्षपद सीएमएफ / यूएस नेव्हसेंट / यूएस फिफ्थ फ्लीटचे कमांडर वाइस एडमिरल कर्ट ए रेनशॉ यांनी भूषवले. भारतीय नौदलाचे उपप्रमुख (डीसीएनएस) व्हाइस एडमिरल तरुण सोबती तसेच इतर सदस्य राष्ट्रांतील वरिष्ठ लष्करी अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. भारतीय नौदलाचे शौर्य चक्र कमांडर मिलिंद एम मोकाशी यांनी अधिकृतपणे इटालियन नौदलाच्या निवर्तमान कमांडरकडून सीटीएफ 154च्या कमांडरपदाची सूत्रे स्वीकारली.
संयुक्त कृती दल 154 हे प्रामुख्याने संयुक्त सागरी दलाच्या सदस्य राष्ट्रांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीवर लक्ष केंद्रीत करते. यातूनच भारताचे व्यावसायिक नैपुण्य, कार्यान्वयन अनुभव आणि संयुक्त सागरी दलातील 47 राष्ट्रांपैकी एक पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून असलेली भूमिका यावरील वाढता विश्वास प्रतिबिंबित होतो.
मे 2023 मध्ये स्थापन करण्यात आलेले संयुक्त कार्यदल 154 हे मध्य पूर्व तसेच विस्तृत प्रादेशिक क्षेत्रात बहुराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून सागरी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी समर्पित आहे.
प्रशिक्षणादरम्यान पाच महत्त्वाच्या स्तंभांवर भर दिला जातो : सागरी क्षेत्र जागरूकता, सागरी कायदा, सागरी प्रतिबंधात्मक ऑपरेशन्स, सागरी बचाव आणि सहाय्य आणि नेतृत्व विकास. कृती दलाच्या वतीने नियमितपणे सागरी सुरक्षा वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम, कंपास रोझ आणि नॉर्दर्न/सदर्न रेडीनेस सारखे सराव आयोजित केले जातात. याशिवाय, बेकायदेशीर तस्करी, समुद्री चाचेगिरी आणि अनियमित स्थलांतर यासारख्या सामाईक धोक्यांविरुद्ध भागीदार राष्ट्रांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सहकार्य आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात.
संयुक्त कार्यदल 154 हे संयुक्त सागरी दलाच्या इतर कार्यदलांसह समन्वयाने कार्य करते : सीटीएफ 150 (सागरी सुरक्षा), सीटीएफ 151 (चाचेगिरीविरोधी कारवाई), सीटीएफ 152 (अरबी आखातातील सागरी सुरक्षा), सीटीएफ 153 (लाल समुद्रातील सागरी सुरक्षा), भारतीय नौदल एक फलदायी कार्यकाळ, उच्च प्रभावशाली प्रशिक्षण उपक्रम आणि शांतता, समृद्धी तसेच सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय सागरी भागीदारीला पुनर्स्थापित करण्यासाठी या संधीकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे.
(1)W2LH.jpeg)
(2)MGMW.jpeg)
(2)5WGN.jpeg)
(2)Y13T.jpeg)
(2)JO3P.jpeg)
(2)U2MC.jpeg)
***
NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2226869)
अभ्यागत कक्ष : 28