वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्ती नेटवर्क नियोजन गटाने 16.10 लाख कोटी रुपयांच्या 352 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे केले मूल्यांकन

Posted On: 10 FEB 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2026

पीएम गती शक्ती  राष्ट्रीय मास्टर प्लॅन (पीएमजीएस-एनएमपी) आराखड्याअंतर्गत स्थापन केलेला नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (एनपीजी) केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करतो; जेणेकरून नियोजन टप्प्यावर एकात्मिक नियोजन, बहुविध व्यवस्था,अंतर्गत व्यवस्था, समान पातळीवरील प्रयत्न, शेवटच्या मैलापर्यंत वाहतूकीची व्यवस्था, प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरातील व्यापक विकास, डेटा-चालित निर्णय घेणे इत्यादी बाबी सुनिश्चित करता येतील.आजपर्यंत, या एनपीजी यंत्रणेद्वारे एकूण अंदाजे 16.10 लाख कोटी रुपये खर्चाच्या 352 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या 352 प्रकल्पांपैकी 201 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून - त्यापैकी 167 प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात आहेत.

2022-23 या वर्षातील  भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना" याच्या दुसऱ्या टप्प्यात ( ,प्रधानमंत्री गती शक्ती भाग-II याच्या संबंधित खर्चासाठी)  वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांमध्ये 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्जाच्या स्वरूपात वितरणासाठी 5000कोटी रुपयांची तरतूद केली आहे "भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना" याच्या दुसऱ्या टप्प्यात (भाग-II)  मंजूर झालेल्या राज्यांच्या प्रकल्पांची माहिती आणि वाटप केलेल्या निधीची माहिती पुढे दिली आहे

पंतप्रधान गती शक्ती फ्रेमवर्क अंतर्गत नियोजित आणि मूल्यांकन केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसह,150 कोटी रुपये आणि त्याहून अधिक खर्चाच्या केंद्रीय क्षेत्रातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे निरीक्षण सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयद्वारे केले जाते.शिवाय, प्रकल्पांतील मैलाचे दगड ठरणाऱ्या ठिकाणी-आधार-देखरेख करणे आणि समस्यांचे निराकरण जलद करणे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा मोठ्या प्रमाणावर जलद मागोवा घेणे (अंदाजे 500 कोटी रुपये आणि त्याहून अधिक खर्च असलेले) या उद्देशाने एक संस्थात्मक यंत्रणा, म्हणजेच प्रकल्प देखरेख गट (पीएमजी) देखील स्थापन करण्यात आला आहे.

वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ANNEXURE-A

Ministry-wise details of Projects evaluated through the NPG Mechanism under the PM GatiShakti Framework

Ministry/Department

Number

of Projects evaluated by NPG

Sanctioned

Yet to be

Sanctioned

Under

Implementation

Total

Estimated Cost

(Rs. in Crore)

Ministry of Road Transport and Highways

164

87

77

55

8,61,821

Ministry of Railways

137

83

54

83

4,22,324.84

Ministry  of  Housing and Urban Affairs

23

7

16

7

2,01,264

Ministry of Petroleum and Natural Gas

4

4

0

3

9,271

Ministry of Ports, Shipping and Waterways

3

2

1

1

49,758.86

Ministry of Civil Aviation

5

3

2

3

7,871

NICDC, Department

for Promotion of Industry and Internal Trade

12

12

0

12

28,693

Ministry of New and

Renewable Energy

01

1

0

1

20,773.70

Ministry of Electronics and Information Technology

01

0

1

0

4,680

Ministry of Textiles

02

02

0

2

3,957

Grand Total

352

201

151

167

16,10,414

 

ANNEXURE-B

State Wise Fund Allocation Under Part-II of the Scheme for Special Assistance to States for Capital Investment for 2022-23.

Sr.

No.

States

No. of Projects approved by the

Department of Expenditure (DoE)

Approved Capital Expenditure

(Rs. in Crores)

1

West Bengal

30

376

2

Chhattisgarh

27

168.42

3

Bihar

21

502.92

4

Uttar

Pradesh

15

896.91

5

Madhya

Pradesh

11

393

6

Maharashtra

8

316

7

Tamil Nadu

8

204

8

Rajasthan

7

301

9

Assam

6

156

10

Nagaland

5

28.43

11

Kerala

4

96

12

Tripura

4

35

13

Gujarat

3

174

14

Haryana

3

55

15

Jharkhand

3

165

16

Manipur

3

36

17

Himachal

Pradesh

3

42

18

Arunachal

Pradesh

3

87.85

19

Andhra

Pradesh

2

202

20

Karnataka

2

182

21

Meghalaya

2

38

22

Mizoram

2

25

23

Uttarakhand

2

56

24

Goa

1

19

25

Punjab

1

90

26

Sikkim

1

19

27

Telangana

1

100

28

Odisha

0

0

 

Total

178

4764.53

Source: Department of Expenditure’s Office Memorandum (OM) for approval of projects under Part-II of the Scheme for Special Assistance to States for Capital Investment for 2022-23


सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2225967) अभ्यागत कक्ष : 21