दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वॉशिंग्टन डीसी येथील पोर्टुलन्स इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या नेटवर्क रेडिनेस निर्देशांक अहवाल 2025 मध्ये भारताची उल्लेखनीय कामगिरी

Posted On: 09 FEB 2026 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2026

4 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडिनेस निर्देशांक 2025 (NRI 2025) अहवालानुसार, भारताने चार स्थानांची प्रगती करत 45 वे स्थान गाठले आहे. या अहवालात 127 अर्थव्यवस्थांच्या नेटवर्क-आधारित रेडिनेसचे मूल्यांकन करण्यात आले आहे, जे तंत्रज्ञान, लोक, शासन आणि परिणाम या चार स्तंभांमधील त्यांच्या कामगिरीवर आधारित आहे. यात एकूण 53 निर्देशकांचा समावेश आहे. हा अहवाल वॉशिंग्टन डीसी येथील एक स्वतंत्र, ना-नफा संशोधन आणि शैक्षणिक संस्था असलेल्या पोर्टुलन्स इन्स्टिट्यूटने तयार केला आहे.

भारताने केवळ आपल्या क्रमवारीतच सुधारणा केली नाही, तर आपल्या गुणांमध्येही सुधारणा केली आहे. 2024 मध्ये 100 पैकी 53.63 गुण मिळवणाऱ्या भारताने 2025 मध्ये 100 पैकी 54.43 गुण मिळवले आहेत. भारत अनेक निर्देशकांमध्ये आघाडीवर आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. अहवालानुसार, भारताने “दूरसंचार सेवांमधील वार्षिक गुंतवणूक”, “कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक वैज्ञानिक प्रकाशने”, “आयसीटी सेवा निर्यात” आणि “ई-कॉमर्स कायदे” या निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे तसेच, “एफटीटीएच/बिल्डिंग इंटरनेट सबस्क्रिप्शन”, “देशांतर्गत मोबाइल ब्रॉडबँड इंटरनेट ट्रॅफिक” आणि “आंतरराष्ट्रीय इंटरनेट बँडविड्थ” मध्ये दुसरा क्रमांक, तर “देशांतर्गत बाजारपेठेचा आकार” आणि “उत्पन्नातील असमानता” मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.

भारताची नेटवर्क रेडीनेस त्याच्या आर्थिक स्थितीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे एनआरआय 20025 अहवालात म्हटले आहे.

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2225467) अभ्यागत कक्ष : 21