युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडा धोरण
Posted On:
06 FEB 2026 9:28AM by PIB Mumbai
केंद्र सरकारने दिनांक 10.07.2025 रोजी ‘खेलो भारत नीती-2025’ अंमलात आणली आहे. या धोरणाचे उद्दिष्ट भारतात एक मजबूत, सर्वसमावेशक आणि उत्कृष्ट कामगिरीवर आधारित क्रीडा परिसंस्था निर्माण करणे हे आहे. या नीतीचे ध्येय "राष्ट्र उभारणीसाठी क्रीडा, राष्ट्राच्या समग्र विकासासाठी क्रीडा शक्तीचा वापर" असे आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी, ही नीती अनेक प्रमुख उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करते, ज्याचे तपशील सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध आहेत.https://yas.nic.in/sites/default/files/Khelo-Bharat-Niti2025_0.pdf.
खेलो भारत नीती, 2025 या धोरणान्वये तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करणे, शहरी आणि ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडू ओळखण्यास मदत करणे अशा उद्दिष्टांच्या तरतुदींचा समावेश आहे, ज्यामध्ये क्रीडा संधींचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. हे धोरण महिला, दिव्यांग व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटांसह समाजातील विविध घटकांमधील खेळाडूंसाठी मूलभूत प्रशिक्षण सुविधा, समर्पित क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडास्पर्धा व्यासपीठांमध्ये सुधारित प्रवेश प्रस्तावित करून ग्रामीण-शहरी यांच्यातील दरी भरून काढण्यास मदत करते. तसेच शालेय शिक्षणासह खेळांचे एकत्रीकरण अधोरेखित करते, समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देते आणि विस्तृत प्रसार करण्यासाठी आणि सहभागातील अडथळे कमी करण्यासाठी अनेक भागधारकांमधील सहकार्याला प्रोत्साहन देते. तसेच, हे धोरण खेळाडूंच्या तयारीची एकूण गुणवत्ता वाढविण्यासाठी उच्च-स्तरीय प्रशिक्षण केंद्रांच्या विकासासह आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा आणि संरचित प्रशिक्षण प्रणालींमध्ये गुंतवणूक करण्याची रूपरेषा दर्शवते.
'क्रीडा' हा विषय राज्याच्या अखत्यारित येत असल्याने, क्रीडा प्रोत्साहन आणि विकासाची प्राथमिक जबाबदारी संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांची आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय क्रीडा धोरणाशी सुसंगत राहून, त्यांच्या सध्याच्या योजना आणि कार्यक्रमांद्वारे या प्रयत्नांना पूरक समर्थन देते, जे परिभाषित मार्गदर्शक तत्त्वे आणि अहवाल यांच्या तयार चौकटीत काम करतात. खर्च विभागाने जारी केलेल्या मूल्यांकन मार्गदर्शक तत्त्वांनुसार तृतीय-पक्ष मूल्यांकनाद्वारे त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते.
ही माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी गुरुवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
***
नितीन फुल्लुके / संपदा पाटगावकर/परशुराम कोर
(Release ID: 2224460)
अभ्यागत कक्ष : 9