रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रवाशांच्या सुखकर आणि अडथळामुक्त प्रवासासाठी भारतीय रेल्वे यंदा विक्रमी संख्येनं होळीसाठी विशेष गाड्या सोडणार

Posted On: 05 FEB 2026 10:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

आगामी होळी सणाच्या काळात प्रवाशांच्या सुखकर आणि अडथळामुक्त प्रवासासाठी भारतीय रेल्वेने आपल्या सर्व मार्गांवर 1,410 पेक्षा जास्त होळी विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. ही संख्या 1500 पर्यंत वाढवली जाणार आहे. या विशेष गाड्या मार्च महिन्यात चालवल्या जातील. 2026 या वर्षातील होळीच्या सणासाठी आत्ता केलेल्या नियोजनाप्रमाणे एकूण 1,144 विशेष गाड्या चालविण्‍यात येतील. गरजेप्रमाणे गाड्यांची संख्‍या वाढविण्‍यात येणार आहे.

याअंतर्गतच्या विभागनिहाय माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या वतीने 209 होळी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत, तर पश्चिम मार्गावरील प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने 231 गाड्यांचे नियोजन केले आहे. पूर्व मध्य रेल्वे सर्वाधिक 285 विशेष गाड्या चालवणार असून, त्याखालोखाल दक्षिण मध्य रेल्वे 160 गाड्यांची सेवा पुरवणार आहे. उत्तर रेल्वे देखील 108 होळी विशेष गाड्या चालवणार आहे, तर उत्तर पश्चिम रेल्वेने 71 गाड्यांचे नियोजन केले आहे. याव्यतिरिक्त, कोकण रेल्वे 9 विशेष गाड्या चालवणार आहे आणि दक्षिण रेल्वे 39 होळी विशेष गाड्या चालवणार आहे.

प्रमुख सणांच्या काळात प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि कार्यक्षम कार्यान्वयनाची सुनिश्चिती करण्यासाठी भारतीय रेल्वे सदैव वचनबद्ध आहे.

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2224182) अभ्यागत कक्ष : 6