वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि आखाती सहकार्य परिषदेमध्ये भारत-जीसीसी मुक्त व्यापार कराराच्या संदर्भ अटींवर स्वाक्षरी

प्रविष्टि तिथि: 05 FEB 2026 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

भारत आणि आखाती सहकार्य परिषद (GCC) यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या संदर्भ अटींवर आज दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे स्वाक्षरी करण्यात आली. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव आणि  चर्चाप्रमुख  अजय भादू आणि आखाती सहकार्य परिषदेच्या सचिवालय महासंघाचे चर्चाप्रमुख डॉ. राजा अल मरझौकी यांनी या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री  जितिन प्रसाद आणि वाणिज्य सचिव  राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत या स्वाक्षरी केल्या गेल्या.

या संदर्भ अटींमुळे (ToRs) भारत आणि आखाती सहकार्य परिषद यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची व्याप्ती आणि पद्धती निश्चित होऊन, त्याला योग्य दिशा मिळू शकणार आहे.

या स्वाक्षरी सोहळ्याला पीयूष गोयल यांनी संबोधित केले. हा मुक्त व्यापार करार जागतिक कल्याणासाठीचे बळ वाढवणारा करार ठरेल असे ते म्हणाले. या करारामुळे दोन्ही प्रदेशांमधील संबंधामध्ये पूर्वानुमानाची क्षमता आणि स्थैर्य येईल, त्यामुळे परस्पर संबंध नव्या उंचीवर पोहोचतील, असेही त्यांनी अधोरेखित केले.

आखाती सहकार्य परिषदेच्या सचिवालय महासंघाचे चर्चाप्रमुख डॉ. अल मरझौकी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. आखाती देश आणि भारतात ऐतिहासिक व्यापार संबंध आहेत, या संदर्भ अटींवर स्वाक्षरी होणे म्हणजे दोन्ही प्रदेशांना फायदेशीर ठरणाऱ्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची खऱ्या अर्थाने झालेली सुरुवात आहे असे ते म्हणाले.

भारतातून आखाती देशांमध्ये होणाऱ्या प्रमुख निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तू, तांदूळ, कापड, यंत्रसामग्री, रत्ने आणि दागिन्यांचा समावेश असतो. तर आखाती देशांतून भारतात होणाऱ्या प्रमुख आयातीमध्ये प्रामुख्याने कच्चे तेल, नैसर्गिक वायू इंधन (LNG), पेट्रोकेमिकल्स आणि सोन्यासारख्या मौल्यवान धातूंचा समावेश आहे.

सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2224161) आगंतुक पटल : 61
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Telugu , Kannada , Malayalam