गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे स्वप्न प्रतिबिंबित करणारा आणि पुढील 25 वर्षांची रूपरेषा मांडणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्येक भारतीयाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे केले अभिनंदन


उत्पादनापासून ते पायाभूत सुविधांपर्यंत, आरोग्यापासून ते पर्यटनापर्यंत, ग्रामीण भागापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत, खेळापासून ते तीर्थक्षेत्रांपर्यंत, विकसित भारताचा अर्थसंकल्प प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येक शहरातील युवा, महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना सामर्थ्य देणारा आणि ती पूर्ण करणारा अर्थसंकल्प – अमित शहा

विकसित भारत अर्थसंकल्प हा पंतप्रधान मोदी यांचा निरोगी भारताचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे

Posted On: 01 FEB 2026 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी  2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे स्वप्न प्रतिबिंबित करणारा आणि पुढील 25 वर्षांच्या रूपरेषा मांडणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे.

समाज माध्‍यम -एक्स’ वर  पोस्टच्या मालिकेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले, "उत्पादनापासून पायाभूत सुविधांपर्यंत, आरोग्यापासून पर्यटनापर्यंत, ग्रामीण भागापासून ते कृत्रिम प्रज्ञेपर्यंत, खेळापासून तीर्थक्षेत्रांपर्यंत, विकसित भारत अर्थसंकल्प हा प्रत्येक गाव, प्रत्येक खेडे आणि प्रत्येक शहरातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना सामर्थ्य देणारा, आणि ती पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे.”

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026-27 च्या अर्थसंकल्पातून हे सिद्ध केले आहे की,  आत्मनिर्भर आणि विकसित भारत ही केवळ घोषणा नाही तर आमच्या सरकारचा संकल्प आहे. विकसित भारताचा अर्थसंकल्प हा जगातील प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर भारत घडवण्याचा दृष्टीकोन आहे.”

अमित शाह म्हणाले की, विकसित भारत अर्थसंकल्प भारतातील कनेक्टिव्हिटीला अभूतपूर्व गती देईल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले, "विकसित भारत अर्थसंकल्पात पशुधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा दूरदर्शी निर्णय घेण्यात आला आहे.”

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "विकसित भारताचा अर्थसंकल्प हा शिक्षणापासून स्वयंरोजगारापर्यंतच्या पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीचे  प्रतिबिंब आहे.”

अमित शहा म्हणाले की, विकसित भारत अर्थसंकल्प आपल्या तरुणांच्या सामर्थ्याचा उपयोग करून देशाला समृद्धीच्या एका नव्या युगात घेऊन जात आहे, त्यासाठी 15,000 शाळांमध्ये आशय निर्मिती प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे आणि किफायतशीर दरात क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

अमित शाह म्हणाले की, विकसित भारत अर्थसंकल्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निरोगी भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांना शिक्षित आणि समृद्ध करून त्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहे. विकसित भारत अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे उघडण्याची योजना असून, या अंतर्गत आपल्या भगिनींना उत्तम आणि सुरक्षित वातावरणात शिक्षणाची संधी मिळेल.

त्याच वेळी, महिलांना ‘लखपती दीदी’ बनवल्यानंतर मोदी सरकार आता महिलांसाठी ‘SHE Marts’ उघडणार आहे. ही किरकोळ दुकाने महिलांना उद्योजक बनवण्याच्या दिशेने एक मजबूत पाया निर्माण करतील. तसेच, ‘She-Mark’ बॅजच्या लाँचिंगमुळे महिलांसाठी सुलभ वित्तपुरवठा सुनिश्चित होईल.”

https://x.com/AmitShah/status/2017861778190045639?s=20

https://x.com/AmitShah/status/2017874844088734173?s=20

https://x.com/AmitShah/status/2017861597423931763?s=20

https://x.com/AmitShah/status/2017863920829218912?s=20

https://x.com/AmitShah/status/2017886913601179857?s=20

https://x.com/AmitShah/status/2017874314536882624?s=20

https://x.com/AmitShah/status/2017872888305775031?s=20

https://x.com/AmitShah/status/2017887494210011164?s=20

https://x.com/AmitShah/status/2017872605345411100?s=20

https://x.com/AmitShah/status/2017887957982822791?s=20

https://x.com/AmitShah/status/2017897730908291400?s=20

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2221907) अभ्यागत कक्ष : 18