पोलाद मंत्रालय
भारतीय पोलाद प्राधिकरणाकडून "सेल-e-BRATION" या स्पर्धेचा प्रारंभ: 'स्टील-टू-सोल' नातेसंबंध साजरे करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2026 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2026
पोलाद मंत्रालयांतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय पोलाद प्राधिकरण (स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड-सेल) या महारत्न कंपनीने MyGov च्या सहकार्याने 30 जानेवारी 2026 रोजी “सेल-e-BRATION: स्टील बिल्ट इंडिया, सेल बिल्ट ट्रस्ट” ही स्पर्धा सुरू केली आहे. भारतीय नागरिकांना रिल्स, सिनेमॅटिक स्टोरीज आणि डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातून आपले कथाकथनाचे कसब प्रदर्शित करण्याकरिता आमंत्रित करण्यासाठी या देशव्यापी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मोहिमेची उद्दिष्टे
प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन जीवनातील ‘सेल’ ची अविभाज्य भूमिका अधोरेखित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ब्रँडला एक "विश्वासार्ह मित्र" म्हणून सादर करून, ही मोहीम "स्टील-टू-सोल" हे भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे ‘सेल’ देशाच्या पायाभूत सुविधा उभारत असतानाच दुसरीकडे देशाच्या नागरिकांच्या जीवनातील बहुमूल्य क्षणांची देखील जपणूक करत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
सहभागासाठी विषय
सहभागी खालील चार विषयांपैकी एक निवडू शकतात:
- भारताची मोठी स्वप्ने साकारणे: रेल्वे, पूल आणि महामार्ग यांसारख्या राष्ट्राच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचे दर्शन घडवणे.
- शील्ड आणि स्टार: राष्ट्रीय संरक्षण (रणगाडे आणि जहाजे) आणि अंतराळ संशोधनातील सेलचे योगदान अधोरेखित करणे.
- प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडले गेले आहे सेल: शाळा, रुग्णालये आणि क्रीडा कार्यक्रमांद्वारे सेल चा समाजावर होणारा परिणाम दर्शवणे.
- सर्वत्र उत्पादने: घरे, कार्यालये आणि शहरांमध्ये एक 'अदृश्य सोबती' म्हणून सेल चे अस्तित्व दाखवणे.
बक्षिसे आणि बहुमान
भारतातील सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी, पहिल्या 5 विजेत्यांना खालीलप्रमाणे पुरस्कृत केले जाईल:
- रोख बक्षीस: प्रत्येकी रु. 10,000.
- अधिकृत दखल: सेल कडून प्रशंसा पत्र आणि प्रमाणपत्र.
- राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी: विजयी प्रवेशिका सेल च्या सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केल्या जातील.
सहभागी कसे व्हावे?
- पात्रता: सर्व भारतीय नागरिकांसाठी स्पर्धा खुली
- स्वरूप: व्हिडिओ MP4 फॉरमॅट, 1080p रिझोल्यूशन आणि कमाल 120 सेकंद (2 मिनिटे) असावा.
- भाषा: हिंदी किंवा इंग्रजीमध्ये प्रवेशिका स्वीकारल्या जातील.
- सादरीकरण: सहभागींनी त्यांचे व्हिडिओ क्लाउड प्लॅटफॉर्मवर (उदा. गुगल ड्राइव्ह किंवा यूट्युब अनलिस्टेड लिंक) अपलोड करून त्याची लिंक MyGov पोर्टलवर सबमिट करावी.
- अंतिम मुदत: सर्व प्रवेशिका 16 February 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) सादर करणे आवश्यक आहे.
MyGov ची लिंक: https://www.mygov.in/task/sail-e-bration-steel-built-india-sail-built-trust-reel-contest/
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221285)
आगंतुक पटल : 11