महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर संयुक्त राष्ट्रांच्या सामाजिक विकास आयोगाच्या 64 व्या सत्रात भारतीय प्रतिनिधीमंडळाचे करणार नेतृत्व

प्रविष्टि तिथि: 31 JAN 2026 12:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2026

 

महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर, संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सामाजिक विकास आयोगाच्या 64 व्या सत्रात भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी न्यूयॉर्कला भेट देणार आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा एक कार्यात्मक आयोग असलेला सामाजिक विकास आयोग, सामाजिक समावेशन, समानता आणि कल्याण-केंद्रित धोरणांसह सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हे वार्षिक सत्र सदस्य राष्ट्रांना प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, अनुभव सामायिक करण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ प्रदान करते.

64व्या सत्रातील भारताचा सहभाग सामाजिक विकासावरील बहुपक्षीय प्रयत्नांमध्ये भारताचा निरंतर सहभाग आणि जागतिक सामाजिक धोरणांच्या प्राधान्यांवर रचनात्मक संवादाप्रती असलेली त्याची वचनबद्धता दर्शवतो. या भेटीमुळे संयुक्त राष्ट्रांच्या संस्था आणि इतर सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी सामाजिक विकासाशी संबंधित बाबींवर संवाद साधण्याची संधीही मिळेल.

 

* * *

नितीन फुल्लुके/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2221162) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil