खते विभाग
azadi ka amrit mahotsav

रेल्वे आणि खते विभागाच्या समन्वयामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील मालवाहतुकीला चालना


रेल्वेच्या अखंड परिचालनामुळे खतांची नियमित वाहतूक

सरकारचा सर्व राज्यांमध्ये खतांचा मुबलक साठा

उद्दिष्ट केंद्रित नियोजन आणि देखरेखीमुळे शेतकरी आणि अन्न सुरक्षेला आधार

प्रविष्टि तिथि: 30 JAN 2026 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2026

 

शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध होतील, याची खात्री करणे, हे सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. या अनुषंगाने, खरीप हंगाम 2025 आणि चालू रब्बी हंगामात रेल्वे मंत्रालय आणि खते विभाग यांच्यातील सुधारलेल्या समन्वयाचे थेट परिणाम स्पष्टपणे दिसून आले. खतांच्या रेकची जलद आणि सुरळीत वाहतूक झाल्यामुळे राज्यांना खतांचा वेळेवर पुरवठा करणे शक्य झाले, परिणामी, शेतकऱ्यांना ऐन लागवडीच्या हंगामात खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची हमी मिळाली. रेल्वे मंत्रालयाच्या या सहकार्याची खते विभागाने प्रशंसा केली असून, या समन्वित प्रयत्नांमुळे देशभरात पुरेशा प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध करायला सहाय्य झाले, असे नमूद केले आहे.

या कालावधीत, जुलै 2025 मध्ये रेकची सरासरी वाहतूक प्रतिदिन 72 रेक्सपर्यंत वाढली, ऑगस्ट 2025 मध्ये ती प्रतिदिन 78 रेक्स, तर सप्टेंबर 2025 मध्ये ती प्रतिदिन 80 रेक्सपर्यंत पोहोचली.

2025-26 या आर्थिक वर्षात, एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत सरकारने सर्व राज्यांमध्ये सर्व प्रमुख खतांचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. युरियाची, 312.40 लाख मेट्रिक टन आवश्यकता आहे, तरी सरकारने 350.45 लाख टन युरियाचा साठा उपलब्ध केला. त्याचप्रमाणे,  प्रमुख पी अँड के खतांची (उदा. डीएपी, एमओपी आणि एनपीकेएस) 252.81 एलएमटी आवश्यकता होती. त्यासाठी 287.69 एलएमटी साठा उपलब्ध करण्यात आला, सातत्याने मूल्यांकन केलेल्या गरजेपेक्षा अतिरिक्त आणि अखंड पुरवठा दिसून आला. राज्यांनी देखील तळागाळापर्यंतच्या शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत.

एप्रिल ते डिसेंबर दरम्यान प्रमुख खतांचा एकूण पुरवठा (एलएमटीमध्ये)

एप्रिल-डिसेंबर 2025 दरम्यान खतांच्या वाहतुकीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला, या कालावधीत प्रथमच 500 लाख मेट्रिक टनाचा टप्पा पार करत, एकूण पुरवठ्याने 530.16 लाख मेट्रिक टनचा टप्पा ओलांडला. ही आकडेवारी आर्थिक वर्ष 2024-25 च्या संबंधित कालावधीच्या तुलनेत 12.2 टक्के वाढ दर्शवत असून, आर्थिक वर्ष 2023-24 च्या मागील विक्रमापेक्षा 8.5 टक्के जास्त आहे.

युरिया आणि पी अँड के रेक वाहतूक एप्रिल ते डिसेंबर

युरिया रेकची वाहतूक गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्के वाढ नोंदवत 10,841 रेक्सवर पोहोचली,  तर पी अँड के खतांच्या वाहतुकीत 18 टक्के वाढ होऊन, ती 8,806 रेकवर पोहोचली. रेल्वे मंत्रालय, बंदरे, राज्य सरकारे आणि खत कंपन्या यांच्यातील वाढलेल्या समन्वयामुळे ऐन कृषी हंगामात राज्यांना खतांचा सुरळीत आणि वेळेवर पुरवठा झाला.

दरमहा सरासरी खते रेक्स

जुलै ते जानेवारी (13 जानेवारीपर्यंत) या कालावधीची महिनानिहाय तुलना केल्यावर गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीच्या तुलनेत सातत्यपूर्ण वाढ दिसून येते.

खतांच्या वाहतुकीतील उल्लेखनीय कामगिरीवरून, सरकारचे भक्कम नियोजन, प्रत्यक्ष समन्वय, वाहतुकीमधील अडथळ्यांचे सक्रिय निराकरण, तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर परिणाम केंद्रित देखरेख दिसून येते.

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2220850) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada