पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागरिककेंद्रित प्रशासन आणि घटनात्मक मूल्यांवरील लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2026 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2026
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर सामायिक केला आहे.
आज शासनव्यवस्थेच्या केंद्रस्थानी नागरिक आहेत, असे या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रजासत्ताक सामाजिक न्यायाला चालना देत असून आर्थिक समावेशन सक्षम करीत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे कल्याणाभिमुख लोकशाही प्रजासत्ताकाची घटनात्मक दृष्टी साकार होत आहे, असे लेखात नमूद केले आहे.
संरक्षण मंत्र्यांच्या या लेखाबाबत ‘X’ वरील संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी म्हणाले,
“प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संरक्षण मंत्री @rajnathsingh जी यांनी आज प्रशासनाच्या केंद्रस्थानी नागरिक असल्याचे सविस्तररित्या मांडले आहे. प्रजासत्ताक सामाजिक न्यायाला चालना देत असून आर्थिक समावेशन सक्षम करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या सर्व प्रयत्नांमुळे कल्याणाभिमुख लोकशाही प्रजासत्ताकाच्या घटनात्मक संकल्पनेला बळ मिळत आहे.”
* * *
निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218873)
आगंतुक पटल : 8