नागरी उड्डाण मंत्रालय
‘विंग्ज इंडिया 2026’ : जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या नागरी विमानवाहतूक बाजारपेठेचा उदय दर्शविणारा कार्यक्रम
आशियातील सर्वात मोठा नागरी विमानवाहतूक कार्यक्रम भारतीय विमानवाहतुकीचा उदय आणि जागतिक उड्डाणाच्या भविष्यास अधोरेखित करणार
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2026 2:42PM by PIB Mumbai
जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असलेले भारताचे नागरी विमानवाहतूक क्षेत्र, आशियातील सर्वात मोठा नागरी विमानवाहतूक कार्यक्रम ‘विंग्ज इंडिया 2026’ या वर्षी केंद्रस्थानी असणार आहे. हा कार्यक्रम 28–31 जानेवारी 2026 दरम्यान हैदराबाद येथील बेगमपेठ विमानतळावर आयोजित करण्यात येणार आहे.
या चार दिवसांच्या कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन नागरी विमानवाहतूक मंत्री, राममोहन नायडू किंजारापू यांच्या हस्ते औपचारिकरीत्या केले जाईल. या वेळी भारतातील आणि परदेशातील या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. या उद्घाटनासह जागतिक स्तरावरील एक महत्त्वपूर्ण विमानवाहतूक संमेलन सुरू होईल, ज्यामध्ये संपर्क, उत्पादन, सेवा, नवोन्मेष आणि शाश्वततेच्या क्षेत्रात भारताने प्रमुख विमानवाहतूक केंद्र म्हणून केलेला प्रवास दाखवण्यात येईल.
“इंडियन एव्हिएशन: पेव्हिंग द फ्युचर - फ्रॉम डिझाइन टू डिप्लॉयमेंट, मॅन्युफॅक्चरिंग टू मेंटेनन्स, इन्क्लुझिव्हिटी टू इनोव्हेशन अँड सेफ्टी टू सस्टेनेबिलिटी” या संकल्पनेभोवती आधारित ‘विंग्ज इंडिया 2026’ मध्ये भारताच्या विमानवाहतूक परिसंस्थेची आर्थिक वाढ, प्रादेशिक विकास आणि जागतिक एकात्मतेसाठी एक मजबूत इंजिन म्हणून झालेला विकास अधोरेखित केला जाईल.
भारताच्या विमानवाहतूक वाढीची कथा जागतिक स्तरावर
गेल्या दशकात भारताच्या नागरी विमानवाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे:
प्रवासी वाहतुकीत अनेक पटींनी वाढ झाली असून भारत जगातील अग्रगण्य विमानवाहतूक बाजारपेठांपैकी एक ठरला आहे.भारतीय विमान कंपन्यांनी शेकडो नवीन विमाने ताफ्यात समाविष्ट केली असून विक्रमी विमान खरेदीसाठीच्या नोंदणीमुळे भारत भविष्यातील सर्वात मोठ्या विमान बाजारपेठांपैकी एक बनला आहे.
यूडीएएन सारख्या प्रमुख योजनांअंतर्गत नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ, आधुनिक टर्मिनल्स आणि वाढीव प्रादेशिक वाहतूक संपर्कामुळे विमानतळ आधारित पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार झाला आहे.
विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ), वैमानिक प्रशिक्षण, अंतराळ तंत्रज्ञान उत्पादने , कार्गो लॉजिस्टिक्स आणि प्रगत हवाई गतिशीलता या क्षेत्रांत भारत एक मजबूत केंद्र म्हणून उदयास येत आहे.
शाश्वत विमानचालन इंधन (एसएएफ), हरित विमानतळ आणि डिजिटल हवाई नेव्हिगेशन यांसह शाश्वत विमानवाहतुकीकडे मोठ्या प्रमाणावर वाटचाल सुरू असून त्यामुळे उड्डाणाचे भविष्य नव्याने घडत आहे.
‘विंग्ज इंडिया 2026’ या विलक्षण वाढीचा प्रवास सादर करेल आणि भारताची जागतिक विमानवाहतूक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा सुद्धा अधोरेखित करेल.
विमानवाहतूक उत्कृष्टतेसाठी जागतिक व्यासपीठ
‘विंग्ज इंडिया 2026’ मध्ये पुढील बाबी असतील:
भव्य आणि जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन
स्थिर विमानांचे प्रदर्शन आणि एअरोबॅटिक फ्लायिंग शो
मंत्रीस्तरीय पूर्ण अधिवेशन आणि जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंच
सीईओ राउंडटेबल्स, बी2बी आणि बी2जी बैठका
विमानवाहतूक रोजगार मेळावा आणि विद्यार्थी नवोन्मेष स्पर्धा
प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा
भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब दर्शवणारे रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम
हा कार्यक्रम धोरणकर्ते, जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार, नवोन्मेषक, विमान कंपन्या, विमानतळ, ओईएम, एमआरओ, भाडेपट्टादार, तंत्रज्ञान पुरवठादार, प्रशिक्षण संस्था आणि स्टार्टअप्स यांना एकत्र आणेल, ज्यामुळे भारत जगातील सर्वात व्यापक विमानवाहतूक व्यासपीठांपैकी एक ठरेल.
भक्कम जागतिक आणि देशांतर्गत सहभाग
`विंग्ज इंडिया 2026` मध्ये पुढील प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे:
20 देशांमधील (कंबोडिया, घाना, रशिया, सेशेल्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सिंगापूर, अल्जेरिया, डोमिनिकन प्रजासत्ताक, इराण, मालदीव, मंगोलिया, मोझांबिक, ओमान, कतार, युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका) मंत्रीस्तरीय आणि अधिकृत परदेशी शिष्टमंडळे.
उद्घाटन कार्यक्रम, प्रदर्शने आणि सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार असल्याने भारतीय राज्यांचा सक्रिय सहभाग.
एअरबस, बोईंग, एम्ब्रायर, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), दसॉ, बेल टेक्स्ट्रॉन, एटीआर, पिलाटस, डी हॅविलँड, आरटीएक्स, रोल्स-रॉइस, युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन, सीएसआयआर-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (सीएसआयआर-एनएएल) यांच्यासह जीएमआर, अदानी, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, इतिहाद एअरवेज, थाय एअरवेज, एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर या आघाडीच्या जागतिक आणि देशांतर्गत कंपन्यांनी सहभाग निश्चित केला आहे.
आघाडीच्या विमान कंपन्या, विमानतळ आणि मूळ उपकरण उत्पादक संस्थांचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, त्यामुळे जागतिक विमानवाहतूक क्षेत्रात भारताचे वाढते धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होईल.
भव्य हवाई प्रात्यक्षिके आणि विमान प्रदर्शन
या कार्यक्रमात पुढील बाबी असतील:
विविध प्रकारच्या विमानांची स्थिर आणि उड्डाण प्रात्यक्षिके
भारतीय वायुदलाचा सूर्य किरण एरोबॅटिक संघ तसेच मार्क जेफरीज एरोबॅटिक चमू यांची साहसी हवाई प्रात्यक्षिके
विमानवाहतुकीतील उत्कृष्टता, नवोन्मेष आणि लोकसहभागाचा उत्सव
विचार नेतृत्व आणि भविष्य घडवणारे संवाद
आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 13 विषयाधारित सत्रे, त्यासोबत मंत्रीस्तरीय पूर्ण अधिवेशन आणि जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंच यांचा समावेश असेल. यामध्ये पुढील विषयांचा समावेश राहील:
विमानतळ आणि पायाभूत सुविधा
विमान कंपन्या आणि विमान भाडेपट्टी व्यवस्था
हेलिकॉप्टर आणि व्यावसायिक विमानवाहतूक
देखभाल, दुरुस्ती व पुनर्बांधणी आणि घटक निर्मिती
हवाई मालवाहतूक आणि पुरवठा साखळी
शाश्वत विमान इंधन
प्रगत हवाई गतिशीलता आणि ड्रोन
उड्डाण प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि विमानवाहतुकीतील महिला
व्यवसाय, कौशल्य आणि नवोन्मेष आव्हान
विंग्ज इंडिया 2026 मध्ये पुढील उपक्रमही असतील:
स्वतंत्र प्रदर्शन दालने आणि स्वतंत्र मंडप
संरचित व्यवसाय-ते-व्यवसाय (बी टू बी) आणि व्यवसाय-ते-शासन (बी टू जी ) बैठका
उद्योग आणि कुशल तरुणांना जोडणारा विमानवाहतूक रोजगार मेळावा
भावी विमानवाहतूक नेते घडवण्यासाठी विद्यार्थी नवोन्मेष स्पर्धा
नागरी विमानवाहतूक क्षेत्रातील उत्कृष्टतेला मान्यता देणाऱ्या 30 पेक्षा अधिक पुरस्कारांसह एक प्रतिष्ठित पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असून, त्यासोबत महत्त्वपूर्ण घोषणा, सामंजस्य करार आणि धोरणात्मक भागीदारी अपेक्षित आहेत.
व्यवसाय आणि धोरणांपलीकडे जाऊन विंग्ज इंडिया 2026 मध्ये विमानवाहतूक हे लोककेंद्रित उद्योग म्हणूनही साजरे केले जाईल. विमानवाहतूक रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योग नेते आणि तरुण व्यावसायिक तसेच कुशल मनुष्यबळ यांना जोडले जाईल. तसेच देशातील अग्रगण्य संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी एरोस्पेस आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर केंद्रित नागरी विमानवाहतूक नवोन्मेष आव्हान आयोजित करून पुढील पिढीतील विमानवाहतूक विचारवंत आणि समस्या सोडवणारे घडवले जातील.
लक्ष्यित सहभाग
150 पेक्षा अधिक प्रदर्शक, 7,500 व्यावसायिक अभ्यागत, एक लाख सर्वसाधारण अभ्यागत, 200 पेक्षा अधिक परदेशी प्रतिनिधी, 500 पेक्षा जास्त बी टू बी आणि बी टू जी बैठका तसेच 31 पेक्षा अधिक विमान प्रदर्शनांसह विंग्ज इंडिया 2026 हा केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक विमानवाहतूक समुदायासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2218674)
आगंतुक पटल : 11