कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'कर्तव्य पथा'कडून 'कौशल्य पथा'कडे: प्रजासत्ताक दिनी 'कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालया'च्या चित्ररथातून 'युवा शक्ती'चा गौरव

प्रविष्टि तिथि: 25 JAN 2026 2:58PM by PIB Mumbai

 

यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 'कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय' (एम.एस.डी.ई) आपला भव्य चित्ररथ सादर करणार आहे. "कौशल्याने सक्षम: स्वावलंबी आणि भविष्यासाठी सज्ज भारत" ही या चित्ररथाची मध्यवर्ती संकल्पना आहे. कौशल्याने सक्षम, युवा शक्तीने प्रेरित आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने युक्त असा भारत स्वावलंबनाकडे कशी वाटचाल करत आहे, याचे प्रभावी दर्शन यातून घडवले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कौशल्य दीक्षांत समारंभ 2025' मध्ये गौरव केलेले 'औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे' (आयटीआय) देशातील टॉपर विद्यार्थी, या चित्ररथाचे नेतृत्व करत आहेत.कौशल्याच्या जागतिक नकाशावर भारताचे वाढते वर्चस्व अधोरेखित करण्यासाठी, तैपेई येथे पार पडलेल्या 'वर्ल्ड स्किल्स एशिया स्पर्धा 2025 ' मधील विजेत्यांचाही यात समावेश आहे. हे यश आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वाढत्या गुणवत्तेचे आणि उच्च-स्तरीय कौशल्यांमधील स्पर्धात्मकतेचे प्रतीक आहे.

चित्ररथात महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून प्रशिक्षण घेताना दाखवण्यात आले आहेत. अशा प्रकारे यातून सर्वसमावेशक विकास ठळकपणे दाखवण्यात आला आहे. विशेषतः पारंपरिक चौकटीबाहेरील तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे प्रशिक्षण, 'महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासाला आणि उदयोन्मुख क्षेत्रातील सहभागाला कशी गती देत आहे, हे यात ठळकपणे दिसून येते.

कर्तव्य पथ हा केवळ आपल्या सशस्त्र दलांची ताकद आणि राष्ट्रीय कामगिरी-यश दाखवण्याचे स्थान राहिलेले नाही, तर तो आता युवा शक्तीचा ‘कौशल्य पथ’ बनला आहे, जिथून विकसित भारताच्या दिशेने भारताचा प्रवास पुढे सरकत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा, प्रगत उत्पादन, विजेवर चालणारी वाहतूक आणि अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) यांसारखी भविष्याभिमुख क्षेत्र, या चित्ररथात प्रामुख्याने सादर करण्यात आली. यामधून ‘भविष्यातील कामकाजा साठी भारत कितपत सज्ज आहे, हे अधोरेखित झाले. सर्वांसाठी मोफत, सरकारद्वारे राबवले जाणारे एआय अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारा कौशल्य विकास मंत्रालयाचा SOAR (Skilling for AI Readiness) कार्यक्रम, एआय-सक्षम भूमिका पार पाडण्यासाठी युवकांना सज्ज करण्याच्या भारत सरकारच्या केंद्रित प्रयत्नांचे प्रतीक म्हणून समोर आला. यामुळे एआय क्रांतीत भारत अग्रस्थानी राहील.

पारंपरिक कारागीर आणि हस्तकला क्षेत्रातील तज्ञांचा आधुनिक तंत्रज्ञांसोबत सन्मान करण्यात आला. यामधून आत्मनिर्भरतेची संकल्पना अधोरेखित झाली—जिथे परंपरागत कौशल्ये आणि नवयुगीन क्षमता एकत्रितपणे पुढे वाटचाल करतात.

चित्ररथाच्या मध्यभागी, एका बाजूला सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार, तर दुसऱ्या बाजूला विश्लेषणात्मक कौशल्यांचे प्रतिनिधित्व करणारी मानवी मेंदूची प्रतिकृती होती. त्यासोबतच एकमेकांत गुंफलेले दोन हात 'शासन आणि उद्योग' यांच्यातील भागीदारी दर्शवतात. ही भागीदारी 'PM-SETU' या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे अधिक मजबूत झाली आहे, ज्याअंतर्गत 1000 सरकारी आयटीआय चे आधुनिकीकरण केले जात आहे. हे आयटीआय 'अग्निवीरांच्या' प्रशिक्षणास देखील सहकार्य करतात, जेणेकरून ते तांत्रिक कौशल्यांनी युक्त आणि शिस्तप्रिय तरुण म्हणून राष्ट्रसेवेसाठी सज्ज होतील.

थोडक्यात सांगायचे तर, हा चित्ररथ अशा राष्ट्राची संकल्पना मांडतो जिथे कौशल्य हे विकासाचे इंजिन आहे, नवोन्मेष.हे संधींचे द्वार आहे आणि तरुण पिढी 'विकसित भारता'च्या प्रवासात अग्रभागी आहे.

***

शैलेश पाटील/आशुतोष सावे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2218522) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Odia , Kannada