गृह मंत्रालय
'राष्ट्रीय मतदार दिना'निमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा
आपल्या संविधानाने प्रत्येक मतदाराला समान अधिकार दिल्याची आणि योग्य मतदान आपल्या देशाला योग्य दिशेने नेऊ शकते याची आठवण करून देणारा दिवस
आपल्या मतदान व्यवस्थेचे रक्षण करणे आणि कोणत्याही बाह्य घटकामुळे ती दूषित होणार नाही याची खबरदारी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी
विकसित आणि बलशाली भारताच्या उभारणीसाठी आपले मत मांडण्याच्या शक्तीचा वापर करण्यास वचनबद्ध राहण्याची आपण या दिनाच्या निमित्ताने प्रतिज्ञा करू
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2026 10:26AM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 25 जानेवारी 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 'राष्ट्रीय मतदार दिना'निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यानिमित्त एक्स-समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणतात , "'राष्ट्रीय मतदार दिना'निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या संविधानाने प्रत्येक मतदाराला समान अधिकार दिले असल्याचे आणि योग्य जाणीव ठेवून केलेले मतदान आपल्या देशाला योग्य दिशा दाखवू शकते, याची हा दिवस आपल्याला आठवण करून देतो. आपल्या मतदान व्यवस्थेचे रक्षण करणे आणि कोणताही बाह्य घटकामुळे तिच्यात दोष निर्माण होणार नाही याची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या दिनाचे औचित्य साधून, आपण विकसित आणि बलशाली भारत निर्माण करण्यासाठी आपल्या मतदानाच्या शक्तीचा वापर करण्याची वचनबद्धता जपण्याचा पुन्हा एकदा निश्चय करूया."
***
अंबादास यादव/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218416)
आगंतुक पटल : 5