संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन 2026: नवी दिल्लीत राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धांच्या महाअंतिम सोहळ्यात  आयोजन महाराष्ट्रातील शाळांची उल्लेखनीय कामगिरी


अहिल्यानगरच्या संजीवनी शाळेच्या मुलांच्या ब्रास बँड संघाला प्रथम पुरस्कार तर मुंबईतील विक्रोळीच्या डॉन बॉस्को शाळेच्या मुलींच्या ब्रास बँड पथकाला तृतीय पुरस्कार

संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते विजेत्या संघांना व उर्वरित सहभागी संघांना पारितोषिकांचे वितरण

प्रविष्टि तिथि: 24 JAN 2026 6:33PM by PIB Mumbai

 

77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचा महाअंतिम सोहळा 24 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बाल भवन येथे पार पडला. प्रत्येक विभागातील (पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण) अठरा (18) संघांनी ब्रास बँड मुलगे, ब्रास बँड मुली, पाईप बँड मुलगे आणि पाईप बँड मुली या श्रेणींमध्ये सर्वोच्च सन्मानासाठी स्पर्धेत भाग घेतला आणि विजेत्यांना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रत्येक श्रेणीतील संघांना रोख पारितोषिक (प्रथम - रु. 51,000/-, द्वितीय - रु. 31,000/-, तृतीय - रु. 21,000/-), चषक, तसेच प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. प्रत्येक श्रेणीतील उर्वरित संघांना रु. 11,000/- चे उत्तेजनार्थ रोख पारितोषिक देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या परीक्षकमंडळाने संघांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले. या मंडळात सशस्त्र दलांच्या प्रत्येक शाखेचे (लष्कर,नौदल आणि वायुदल) सदस्य समाविष्ट होते. अंतिम फेरीचे निकाल खालीलप्रमाणे आहेत:

 

 

Prize

 

Schools

 

 

State/UT

 

 

 

Brass Band Boys

 

1st

(Rs 51,000/-)

Sanjivini Sainik School & Junior College, Kopargaon, Distt-Ahilyanagar

Maharashtra

2nd

(Rs 31,000/-)

City Montessori School, Kanpur Road LDA, Lucknow

Uttar Pradesh

 

3rd

(Rs 21,000/-)

St Xavier’s High School, Lupungutu, Chaibasa, West Singhbhum

Jharkhand

 

Consolation Prize – 1

(Rs 11,000/-)

Montessori Indus Residential School

Andhra Pradesh

Consolation Prize – 2

(Rs 11,000/-)

PM SHRI Jawahar Navodaya Vidyalaya, Periye, Kasaragod

Kerala

 

Brass Band Girls

 

1st

(Rs 51,000/-)

Providence Girls Higher Secondary School, Kozhikode

Kerala

 

2nd

(Rs 31,000/-)

St. Joseph College, Ruchi Khand-1, Shardanagar, Aashiyana, Lucknow

Uttar Pradesh

 

3rd

(Rs 21,000/-)

Don Bosco High School & Junior College, Tagore Nagar, Vikhroli East, Mumbai

Maharashtra

 

Consolation Prize

(Rs 11,000/-)

Holly Cross High School, Karbook, Gomati

Tripura

 

 

Pipe Band Boys

 

1st

(Rs 51,000/-)

Kairali School, Sec-2, HEC Township, Ranchi

Jharkhand

 

2nd

(Rs 31,000/-)

Government Boys Sr. Secondary School, Badli

Delhi

 

3rd

(Rs 21,000/-)

The Great India Sainik School, Godhi Mandir Hasaud, Bhansoj Road, Nawagaon, Raipur

Chhattisgarh

Consolation Prize – 1

(Rs 11,000/-)

Shree Swami Narayan Gurukul Kumar Vidyalaya Gir Somnath

Gujarat

 

Consolation Prize – 2

(Rs 11,000/-)

SMT PS Shivashankarappa EM Res. School

Karnataka

 

 

Pipe Band Girls

 

1st

(Rs 51,000/-)

Kasturba Gandhi Balika Vidyalaya, Kanke, Ranchi

Jharkhand

 

2nd

(Rs 31,000/-)

PM SHRI Jawahar Navodaya Vidyalaya, Suratgarh, Sriganga Nagar

Rajasthan

3rd

(Rs 21,000/-)

Government Sarvodaya Kanya Vidyalaya, Raj Nagar Part-II Extn, Palam Colony

Delhi

 

Consolation Prize

(Rs 11,000/-)

PM SHRI Kendriya Vidyalaya, ASC Centre, Bangalore

Karnataka

 

 

(प्रथम पुरस्कार -ब्रास बँड मुलगे - संजीविनी सैनिक स्कूल और जूनियर कॉलेज, कोपरगांव, जिल्हा-अहिल्यानगर महाराष्ट्र)

(तृतीय पुरस्कार ब्रास बँड मुली डॉन  बॉस्को हायस्कूल व जुनियर कॉलेज, टागोर नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई )

या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनात कर्तव्य पथावर सलामीच्या व्यासपीठासमोर कोईम्बतूर च्या वेंकटापुरम मधील अविला कॉन्व्हेंट मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल चे विद्यार्थी विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत.

ही स्पर्धा संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती . पहिली फेरी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये घेतली गेली ज्यात सीबीएसई , आयसीएसई, केव्हीएस, एनव्हीएस, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नेताजी सुभाष चंद्र बोस आवासीय विद्यालय, पीएम श्री व सैनिक स्कूल इत्यादी शाळांनी सहभाग नोंदवला होता.

प्रत्येक राज्यातील प्रत्येक श्रेणीतील चार विजेत्या बँड संघांनी झोनल पातळीवरील स्पर्धेत भाग घेतला होता. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेतील यशामुळे प्रोत्साहित होऊन यावर्षी सहभागाचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढला होता. राज्यपातळीवर 763 शाळांनी भाग घेतला होता, त्यातून 94 बँड संघांची  झोनल पातळीसाठी निवड झाली . झोनल पातळीवरील स्पर्धेत 30 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून  80 शालेय बँड पथकांनी भाग घेतला , ज्यात 2,217 विद्यार्थी सहभागी होते.

***

शैलेश पाटील/उमा रायकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2218359) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Tamil