संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"वंदे मातरमच्या 150 वर्षपूर्तीचा सोहळा"

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2026 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जानेवारी 2026

 

देशभरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गायन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लष्करी बँड सादरीकरणाद्वारे भारतीय आपल्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताची 150 वर्षे साजरी करत आहेत. राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना वृद्धिंगत होण्यास चालना देणे हा सोहळा साजरा करण्याचा  उद्देश आहे 

या सोहळ्याचा एक भाग म्हणून, 21 जानेवारी 26 रोजी नवी दिल्लीतील राजीव चौक येथील अँफीथिएटरमध्ये 31 वादकांचा समावेश असलेल्या भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) बँडने सादरीकरण केले. 45 मिनिटांच्या या सादरीकरणात ब्रास, रीड, तंतु आणि इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या एकत्रित सुरांतून साकारलेल्या अकरा मनमोहक रचनांचा समावेश होता. 'वंदे मातरम' तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी केलेल्या कामगिरीच्या सन्मानार्थ खास तयार करण्यात आलेले 'सिंदूर' हे गाणे या सादरीकरणाचे मुख्य आकर्षण होते.

   

संगीत हे अनेक शतकांपासून भारतीय संस्कृतीचा तेजस्वी मानबिंदू म्हणून वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे. ते भारताच्या समृद्ध लष्करी वारशाचा एक अविभाज्य भाग असून ते एकता आणि प्रेरणादायी शौर्याला प्रोत्साहन देत आले आहे. 1944 मध्ये भारतीय हवाई दल बँडची स्थापना झाल्यापासून तो भारतीय आणि पाश्चात्य संगीताच्या विविध रचनांच्या ठेव्यांसह, देशाच्या लष्करी परंपरेचा एक आधारस्तंभ राहिला आहे. आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाद्वारे देशभक्तीच्या आणि एकतेची भावना चेतविणे हा भारतीय हवाई दल बँडचा उद्देश आहे.

   

 

* * *

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217273) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Urdu , English , Manipuri , Gujarati , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil , Telugu