पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सामायिक केले मुलींचे मोल आणि शक्ती अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2026 9:26AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ज्या देशात मुलींना लक्ष्मी म्हणून मान दिला जातो, तिथे 11 वर्षांपूर्वी याच दिवशी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम सुरू करण्यात आली होती. आज भारतातील मुली प्रत्येक क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत असून देशाच्या प्रगतीत लक्षणीय योगदान देत आहेत, ही खूप अभिमानाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे

पंतप्रधानांनी या पोस्टसोबत भारताच्या कालातीत नीतिपरंपरेत मुलींना असलेले महत्त्व विशद करणारे एक संस्कृत सुभाषित समाजमाध्यमावर सामायिक केले आहे -

“दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान् प्रवर्धयन्। यत् फलम् लभते मर्त्यस्तल्लभ्यं कन्ययैकया॥”

एक मुलगी दहा मुलांच्या समान असते आणि दहा मुलांमध्ये आढळणारे गुण किंवा गुणवैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीला एकाच  मुलीत आढळू शकतात असे या सुभाषितामध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात;
“मुलीला लक्ष्मीसमान मानणाऱ्या आपल्या देशात 11 वर्षांपूर्वी आज या दिवशीच बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियानाची सुरूवात झाली होती. आज भारताच्या लेकी प्रत्येक क्षेत्रात दररोज नवनवीन विक्रम करत आहेत, ही मोठी अभिमानाची बाब आहे

दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान् प्रवर्धयन्।
यत् फलम् लभते मर्त्यस्तल्लभ्यं कन्ययैकया॥”

***

NehaKulkarni/ManjiriGanoo/DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217172) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam