आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी वैद्यकीय शिक्षणात कृत्रिम प्रज्ञा विषयावरील ‘एनबीईएमएस’ ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचा केला प्रारंभ
‘एनबीईएमएस’ एआय कार्यक्रमासाठी 42,000 हून अधिक डॉक्टरांनी केली नोंदणी
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने –(एनबीईएमएस) विकसित केलेल्या वैद्यकीय शिक्षणात कृत्रिम प्रज्ञा (एआय) यावरील ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ केला.

हा कार्यक्रम अंदाजे 50,000 डॉक्टरांना कृत्रिम प्रज्ञेची मूलभूत समज आणि क्लिनिकल प्रॅक्टिस, निदान , क्लिनिकल निर्णय प्रक्रिया, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणात त्याचा व्यावहारिक वापर करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांची डिजिटल क्षमता वाढवणे आणि त्यांना आरोग्यसेवा वितरण आणि शैक्षणिक अभ्यासात एआय-आधारित साधने प्रभावीपणे एकत्रित करण्यास सक्षम बनवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी या उपक्रमाला मिळालेल्या उत्साही प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आणि 42,000हून अधिक डॉक्टरांनी या कार्यक्रमासाठी याआधीच नोंदणी केली आहे असे नमूद केले.

त्या म्हणाल्या की, एआयचा उद्देश डॉक्टरांची जागा घेणे नाही, तर त्यांच्या क्षमता वाढवणे, वैद्यकीय व्यावसायिकांच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी तफावत भरून काढणे आणि रुग्णांचा वाढता भार कमी करणे हा आहे. एआयचा अवलंब जबाबदारी, सुलभता आणि नैतिक वापराच्या तत्त्वांनी मार्गदर्शित असायला हवा जेणेकरून रुग्णांच्या हिताचे रक्षण करताना तंत्रज्ञानातील प्रगती आरोग्यसेवा वितरण बळकट करेल.
या कार्यक्रमात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, एनबीईएमएसचे प्रतिष्ठित अधिकारी आणि औषध, वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रख्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217048)
आगंतुक पटल : 6