भारतीय निवडणूक आयोग
विविध देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांचा लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदे (IICDEM) 2026 च्या मुख्य सत्रात सहभाग, निवडणूक प्रशासनासमोरील जागतिक आव्हानांवर घडली उच्चस्तरीय चर्चा
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे होत असलेल्या लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदे (IICDEM) 2026 च्या मुख्य सत्रात (Plenary) 42 निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला.
भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी या सत्राच्या कामकाजाचा औपचारिक प्रारंभ केला.
या मुख्य सत्रात निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख आणि विविध देशांचे राजदूत / उच्चायुक्त यांच्यासह जवळपास 60 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांचे या सत्रात, अशा संस्थांचे प्रमुख, वरिष्ठ नेते आणि राजदूत एकाच ठिकाणी आले होते, आणि त्यांच्यात लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील उच्चस्तरीय देवाणघेवाण घडून आली.
इंटरनॅशनल आयडिया (International IDEA) या संस्थेच्या 2026 या वर्षासाठीच्या आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील विषयनिहाय प्राधान्यक्रमांची माहिती भारताने या सत्रात मांडली. निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे नेते आणि विविध देशांच्या प्रतिनिधींनी लोकशाही तसेच निवडणूक प्रशासनासमोर असलेल्या जागतिक आव्हानांबाबतची आपली मतेही या सत्रात मांडली. 42 निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला.
शैलेश पाटील/तुषार पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217045)
आगंतुक पटल : 12