युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
लेह येथे उद्यापासून खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा सुरू होणार,संधीचा लाभ घेण्याचे क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांचे खेळाडूंना आवाहन
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
लेह येथे सुरू होणाऱ्या 2026 खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत लडाख टप्प्यात 1000 हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. उद्घाटन समारंभ मंगळवारी दुपारी होणार आहे.
ही स्पर्धा मंगळवारपासून सुरू होऊन 26 जानेवारीपर्यंत चालेल. नवांग दोरजे स्तोबदान (एनडीएस) स्टेडियम, आर्मी रिंक आणि गोठलेला गुपुख तलाव या ठिकाणी स्पर्धा होणार असल्यामुळे ती आकर्षणाची प्रमुख केंद्रे ठरणार आहेत.
या टप्प्यात बर्फावरील स्केटिंग आणि हॉकी मध्ये 472 खेळाडू भाग घेतील. फिगर स्केटिंग या ऑलिम्पिक खेळाचा समावेश यंदा स्पर्धेत केल्यामुळे तो एक कुतूहलाचा विषय ठरेल.
मागील वर्षीच्या लडाख टप्प्यात यजमानांनी 13 पैकी 4 सुवर्णपदके जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले होते. तमिळनाडू दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता.
https://www.instagram.com/reel/DTsHbANE0jb/?igsh=MTZrbTA1YWNyYmxvYg==
लडाखमधील 2026 खेलो इंडिया विंटर गेम्स (केआयडब्लूजी) ही स्पर्धा खेलो इंडियाची दुसरी प्रमुख स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा 5 ते 10 जानेवारी दरम्यान दीव येथे झाली. आता लेहमध्ये सुरू होणाऱ्या विंटर गेम्समध्ये खेळाडू आणि त्यांचा सहायक कर्मचारीवर्ग यांना शून्याखालील तापमान आणि कमी ऑक्सिजन या उंच पर्वतीय हवामानातील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत कामगिरी करावी लागणार आहे.
KPFB.jpeg)
"भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी वर्षाची सुरुवात दमदार झाली आहे. जानेवारी महिन्यात दोन खेलो इंडिया स्पर्धा झाल्या आहेत – दीवमधील बीच गेम्स आणि आता विंटर गेम्स. विंटर गेम्समुळे खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळेल. भारतात आतापर्यंत खेळाडूंना आतापर्यंत मर्यादित प्रमाणातच संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा." असे आवाहन केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे.
लडाख टप्प्यात आइस हॉकी हा प्रमुख खेळ राहणार आहे, तर फिगर स्केटिंग या नव्या क्रीडा प्रकाराचा नव्याने समावेश ही विशेष पर्वणी ठरणार आहे.

या टप्प्यात एकूण 17 सुवर्णपदके मिळवण्यासाठी स्पर्धा होणार असून, त्यापैकी 15 सुवर्णपदके आइस स्केटिंगमध्ये दिली जातील.
सुषमा काणे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216307)
आगंतुक पटल : 7