पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी यूएईचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली विमानतळावर यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत केले.
‘एक्स’ या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:
“यूएईचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत करण्यासाठी मी विमानतळावर गेलो होतो. भारत - यूएई यांच्यातील मजबूत मैत्रीला ते किती महत्त्व देतात हे त्यांच्या या दौऱ्यावरुन दिसून येते. आमच्यामध्ये होणाऱ्या चर्चेबाबत मी उत्सुक आहे.
@MohamedBinZayed”
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216201)
आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam