ऊर्जा मंत्रालय
आयआयटी दिल्ली येथे ऊर्जा क्षेत्रातील नियामक बाबींसाठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 3:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी आज आयआयटी दिल्ली येथे ऊर्जा क्षेत्रातील नियामक बाबींसाठी उत्कृष्टता केंद्राचे (सेंटर ऑफ एक्सलन्स) उद्घाटन केले.
आयआयटी दिल्ली, केंद्रीय विद्युत नियामक आयोग (सीईआरसी) आणि ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड (ग्रिड इंडिया) यांनी संयुक्तपणे स्थापन केलेले हे केंद्र विजेची वाढती मागणी, मोठ्या प्रमाणावर नवीकरणीय ऊर्जेचे एकत्रीकरण, विस्तारणारी ऊर्जा बाजारपेठ आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर यांसारख्या वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या तसेच वेगाने विकसित होत असलेल्या ऊर्जा क्षेत्रातील भारताची नियामक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हे उत्कृष्टता केंद्र नियमन संशोधन, क्षमता विकास, सल्लागार सहाय्य आणि ज्ञान प्रसारासाठी एक राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून गणले जाईल. या केंद्राची स्थापना एका अग्रगण्य शैक्षणिक संस्थेमध्ये करून आणि राष्ट्रीय ऊर्जा नियामक व प्रणाली परिचालक यांच्यातील घनिष्ठ सहकार्याद्वारे त्याला आधार देऊन हा उपक्रम धोरण, नियमन, प्रणाली संचालन आणि शैक्षणिक संशोधन यांना एकाच संस्थात्मक चौकटीत आणतो.
केंद्र सरकार प्रमुख नियमन आणि क्षेत्रीय आव्हाने ओळखण्यासाठी, संस्थात्मक क्षमता मजबूत करण्यासाठी, क्षमता बांधणी आणि मनुष्यबळ विकासाला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रभावी ज्ञान व्यवस्थापन व प्रसाराला चालना देण्यासाठी सीईआरसी आणि ग्रिड इंडियासोबत काम करेल. ते जागतिक शैक्षणिक आणि धोरणविषयक जाळ्यांपर्यंत पोहोचून अत्याधुनिक संशोधन हाती घेईल, तसेच नियमन आणि ऊर्जा क्षेत्रातील इतर भागधारकांसाठी सल्लागार आणि सल्लामसलत सहाय्य उपलब्ध करेल.

आज आयआयटी दिल्ली येथे या केंद्राचे उद्घाटन करताना मनोहर लाल म्हणाले की, भारत स्वच्छ ऊर्जा, स्पर्धात्मक बाजारपेठा आणि ग्राहक-केंद्रित सुधारणांच्या दिशेने वाटचाल करत असताना ज्ञान आणि संशोधनावर आधारित मजबूत नियमन आवश्यक ठरते. आयआयटी दिल्ली येथील हे उत्कृष्टता केंद्र माहितीपूर्ण आणि भविष्यवेधी नियमनाला पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे केंद्र क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी संरचित प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे दीर्घकालीन नियामक क्षमता निर्माण करताना, नियामक आणि प्रणाली संचालकांना पुरावा-आधारित विश्लेषणात्मक माहितीद्वारे देखील मदत करेल.
नेहा कुलकर्णी /नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216080)
आगंतुक पटल : 19