पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून प्रयत्नांची ताकद अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 12:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय परंपरेतील कालातीत विद्वत्तेचा संदर्भ देत राष्ट्रबांधणीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, प्रयत्न सोडून दिले तर जे काही साध्य केले आहे तेही गमावावे लागू शकते आणि भविष्यातील संधी निसटून जातात. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अपेक्षित परिणाम साध्य होतात आणि समृद्धीची निश्चिती होते.
मोदी यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये हे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे,
“अनुत्थाने ध्रुवो नाशः प्राप्तस्यानागतस्य च।
प्राप्यते फलमुत्थानाल्लभते चार्थसम्पदम्॥”
नेहा कुलकर्णी /रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216011)
आगंतुक पटल : 5