पंतप्रधान कार्यालय
भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2026 10:17AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन म्हणजेच एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात केलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी एमजीआर यांच्या बहुआयामी वारशाचा गौरव केला आहे, तसेच तमिळनाडूच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि तमिळ संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित केले आहेत.
या संदर्भात एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश:
एक विलक्षण व्यक्तिमत्त्व असलेल्या एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तमिळनाडूच्या प्रगतीमध्ये त्यांचे अद्वितीय योगदान आहे. त्याचप्रमाणे तमिळ संस्कृती लोकप्रिय करण्यातही त्यांनी बजावलेली भूमिका तितकीच दखलपूर्ण आहे.आपल्या समाजासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
“எம்.ஜி.ஆரின் பிறந்தநாளில் அவருக்கு மரியாதை செலுத்துகிறேன். தமிழ்நாட்டின் முன்னேற்றத்திற்கு அவரது பங்களிப்பு மகத்தானது. தமிழ்க் கலாச்சாரத்தைப் பிரபலப்படுத்துவதிலும் அவரது பங்கு அதே அளவுக்குக் குறிப்பிடத்தக்கது. சமூகத்திற்கான அவரது தொலைநோக்குப் பார்வையை நனவாக்க நாங்கள் எப்போதும் பாடுபடுவோம்.”
***
अंबादास यादव / तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215533)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam