पंतप्रधान कार्यालय
काशी तमिळ संगममच्या विस्तारामुळे देशातील सांस्कृतिक बंध बळकट होत असून ‘एक भारत श्रेष्ठ भारत'ची भावना अधिक दृढ होत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या विचारांतून अधोरेखित केले
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2026 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026
पोंगलच्या पवित्र सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगममच्या लक्षणीय विस्ताराचा आढावा घेतला. हा उपक्रम सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून उदयास आला असून, विविध परंपरा, भाषा आणि समुदायांना एकत्र आणून भारताच्या विविधतेतील एकता या भावनेला बळकटी देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सोमनाथ स्वाभिमान पर्वच्या निमित्ताने सोमनाथ येथे दिलेल्या अलीकडील भेटीदरम्यान पंतप्रधानांनी नागरिकांशी संवाद साधला. या संवादात नागरिकांनी काशी तमिळ संगमम आणि सौराष्ट्र तमिळ संगमम यांसारख्या उपक्रमांचे कौतुक केले.
एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
सोमनाथ स्वाभिमान पर्वच्या निमित्ताने सोमनाथ येथे दिलेल्या माझ्या अलीकडील भेटीदरम्यान काशी तमिळ संगमम आणि सौराष्ट्र तमिळ संगमम यांसारख्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करणाऱ्या नागरिकांशी माझी भेट झाली. आज पोंगलच्या विशेष सणानिमित्त काशी तमिळ संगममच्या विस्ताराबाबत तसेच एक भारत श्रेष्ठ भारतची भावना अधिक सखोल कशी होत आहे, याविषयी मी माझे विचार व्यक्त केले.
अंबादास यादव /राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214837)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam