उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी मकर संक्रांती, पोंगल, लोहडी, माघ बिहू, कानुमा, उत्तरायण, तुसू परब आणि सुगीच्या इतर सणांनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या

प्रविष्टि तिथि: 13 JAN 2026 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026

देशभरात साजऱ्या होत असलेल्या मकर संक्रांत, पोंगल, लोहडी, माघ बिहू, कानुमा, उत्तरायण, तुसू परब आणि इतर सुगीच्या सणांनिमित्त मी माझ्या बंधू-भगिनींना, विशेषत: शेतकरी समुदायाला हार्दिक शुभेच्छा देतो.

आपल्या देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी आणि रीतिरिवाजांनी साजरे होणारे हे सण, ऋतू बदल, सूर्याचे उत्तरायण आणि अनेक महिन्यांचे समर्पण आणि कठोर परिश्रमातून वाढवलेल्या पिकांच्या कापणीचे प्रतीक आहे. एकत्रितपणे, हे सण शेती आणि निसर्गाशी असलेले भारताचे चिरस्थायी सांस्कृतिक बंध प्रतिबिंबित करतात आणि आपल्या समृद्ध विविधतेला आधार देणाऱ्या एकतेवर प्रकाश टाकतात.

भारताचा कृषी वारसा त्याच्या अर्थव्यवस्थेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक जीवनाचा पाया आहे.

कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी भारताने दूरगामी उपक्रम हाती घेतले आहेत. उत्पन्नाची सुरक्षा सुनिश्चित करणे, संस्थात्मक कर्जाचा विस्तार, मातीचे आरोग्य सुधारणे, सिंचन वाढवणे, पीक विम्याला प्रोत्साहन देणे, डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बाजारपेठेतील प्रवेश सुधारणे या उद्देशाने हाती घेतलेल्या उपाययोजनांचे  शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात आणि शेतीला अधिक लवचिक आणि शाश्वत बनवण्यात सहाय्य झाले आहे. हे प्रयत्न शेतकऱ्यांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याच्या आणि शेतीला भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा आधारस्तंभ म्हणून मान्यता देण्याच्या देशाच्या वचनबद्धतेची खात्री देत आहेत.

या मंगल प्रसंगी, आपण आपल्या शेतकरी समुदायाला पाठबळ देण्याच्या  , आपल्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याच्या आणि समावेशक, लवचिक आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी एकत्र येऊन काम करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करूया.

मी सर्व नागरिकांना आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी शुभेच्छा देतो.

जय हिंद! भारत माता की जय!


निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2214337) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Malayalam