प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटीच्या सहकार्याने आयोजित केलेला 'इन्स्पायरिंग इनोव्हेटर्स' कौशल्य उपक्रम संपन्न
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2026 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026
भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) प्रा. अजय कुमार सूद, हे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, नेटफ्लिक्स आणि ग्राफिटी स्टुडिओची टीम यांच्यासह 13 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित, ‘इन्स्पायरिंग इनोवेटर्स- नये भारत की नयी पहेचान’, या नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटीच्या सहकार्याने विकसित केलेल्या कौशल्य उपक्रमाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहिले.यावेळी नवोन्मेषक आणि विद्यार्थीही उपस्थित होते.

ग्राफिटी स्टुडिओजच्या भागीदारीने राबवण्यात आलेला हा उपक्रम कथाकथन आणि प्रत्यक्ष कौशल्याच्या माध्यमातून समाजाला सापेक्ष नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या नवोन्मेष आणि सृजनशील परिसंस्थेला एकत्र आणतो. हा उपक्रम ओपीएसए द्वारे निवडण्यात आलेल्या आठ भारतीय स्टार्ट-अप्सचे योगदान दर्शवतो, ज्यांनी समाजावर प्रभाव पडणाऱ्या नवोन्मेशाला चालना देण्यासाठी काम केले आहे. भारतातील आठ विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आठ लघु, अॅनिमेटेड चित्रपटांद्वारे हे स्टार्ट-अप्स प्रदर्शित करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल बोलताना प्रा. सूद म्हणाले की, इन्स्पायरिंग इनोव्हेटर्सची रचना सामाजिक संदर्भ असलेल्या नवोपक्रमांना अधोरेखित करण्यासाठी आणि त्याच बरोबर कौशल्ये आणि ज्ञानाचा मार्ग बळकट करण्यासाठी केली आहे. स्टार्ट-अप्स आणि विद्यार्थ्यांना सर्जनशील प्रक्रियेद्वारे एकत्र आणून आणि नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटी आणि इंडस्ट्री मेंटरशिपद्वारे कौशल्य विकास करून, हा कार्यक्रम भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेच्या उभारणीसाठी समग्र दृष्टीकोन प्रतिबिंबित करत आहे, आणि धोरणात्मक हेतूंना प्रतिभा विकास आणि वास्तविक जगाच्या अनु प्रयोगाशी जोडत आहे.

या उपक्रमामुळे भारतातील विविध प्रांतांमधील 26 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सर्जनशीलतेचा अनुभव मिळाला. सहभागींपैकी पन्नास टक्के महिला होत्या, तर अनेक विद्यार्थी टियर- II शहरांमधून आले होते. विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी), आणि ग्राफिटी स्टुडिओजच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले, त्यामुळे त्यांना उद्योग प्रक्रियेचा व्यावहारिक, वास्तविक-जगातील अनुभव मिळाला.
विकसित भारत@2047 दृष्टिकोनाला अनुसरून नवोन्मेषाचा सामाजिक लाभ प्रभावीपणे प्रदर्शित केल्याबद्दल डॉ. मुरुगन यांनी इन्स्पायरिंग इनोव्हेटर्स उपक्रमाचे अभिनंदन केले. विविध राज्यांमधील आठ नवोन्मेषकांची कामगिरी आणि यशोगाथा यावर त्यांनी प्रकाश टाकला. विशेषतः मत्स्यव्यवसाय आणि कृषी क्षेत्र आणि समाजासाठी महत्वाच्या असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक तंत्रज्ञानातील त्यांच्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली.
नेटफ्लिक्स इंडियाच्या ग्लोबल अफेअर्स च्या संचालक महिमा कौल म्हणाल्या की, इन्स्पायरिंग इनोव्हेटर्स उपक्रम, भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेला अर्थपूर्ण आणि समावेशक पद्धतीने आकार देणाऱ्या कल्पना प्रदर्शित करण्यासाठी सरकार, उद्योग आणि तरुण निर्मात्यांना एकत्र आणतो.

समारोप समारंभात आठही चित्रपटांचे प्रदर्शन, शंकर महादेवन अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत, आणि सरकारी आणि भागीदार संस्थांच्या वरिष्ठ प्रतिनिधींची भाषणे, याचा समावेश होता. हे आठ चित्रपट येथे पाहता येतील: Netflix India’s YouTube channel.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214332)
आगंतुक पटल : 11