पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान 10 जानेवारी रोजी सोमनाथ मंदिरात आयोजित ओंकार मंत्रपठण कार्यक्रमात होणार सहभागी
पंतप्रधान 11जानेवारी रोजी सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सवात होणार सहभागी
पंतप्रधान 11 जानेवारी रोजी राजकोट येथे कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशांसाठी आयोजित व्हायब्रण्ट गुजरात प्रादेशिक परिषदेचे करणार उद्घाटन
पंतप्रधान 11 जानेवारी रोजी अहमदाबाद मेट्रोच्या उर्वरित भागाच्या दुसऱ्या टप्प्याचे करणार उद्घाटन
पंतप्रधान 12 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेणार
पंतप्रधान आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ 12 जानेवारी रोजी साबरमती आश्रमाला भेट देणार, तसेच आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरातला भेट देणार आहेत. सोमनाथ येथे पंतप्रधानांचे 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास आगमन होईल. पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित ओंकार मंत्रपठण कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतर सोमनाथ मंदिरातील ड्रोन शो बघतील.
सोमनाथ मंदिराच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य वीरयोद्ध्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या शौर्य यात्रेत पंतप्रधान 11 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 9:45 वाजता सहभागी होतील. त्यानंतर सव्वा दहाच्या सुमारास ते सोमनाथ मंदिरात दर्शन घेऊन पूजा अर्चना करतील. त्यानंतर साधारण अकरा वाजता ते सोमनाथ स्वाभिमान पर्व या जाहीर कार्यक्रमात सहभागी होतील.
त्याचदिवशी पंतप्रधान कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशांसाठी आयोजित व्हायब्रण्ट गुजरात प्रादेशिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राजकोटला रवाना होतील.
सुमारे दीड वाजता ते संमेलनस्थळी आयोजित व्यापार मेळा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. दुपारी दोन वाजता पंतप्रधान राजकोट येथील मारवाडी विद्यापीठात कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशांसाठी आयोजित व्हायब्रण्ट गुजरात प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन करतील तसेच उपस्थितांना संबोधित करतील.
राजकोट नंतर पंतप्रधान अहमदाबादला रवाना होतील. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ते महात्मा मंदिर मेट्रो स्थानकातून अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील सेक्टर 10ए ते महात्मा मंदिर या उर्वरित भागाचे उद्घाटन करतील.
पंतप्रधान 12 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेणार आहेत. साधारण सकाळी साडे नऊ वाजता दोन्ही नेते साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत, तर त्यानंतर दहा वाजताच्या सुमारास साबरमती नदीकाठी आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी होणार आहेत.
त्यानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ नुकतीच 25 वर्षे पूर्ण झालेल्या भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतील.
नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212844)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam