रेल्वे मंत्रालय
52 आठवड्यात 52 सुधारणा : भारतीय रेल्वेमध्ये कार्यक्षमता, प्रशासन आणि सेवा वितरणात व्यापक बदल घडविणारे प्रमुख उपक्रम
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीतील रेल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री व्ही.सोमन्ना, रवनीत सिंह, रेल्वे बोर्ड अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीमध्ये रेल्वे क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षात रेल्वे सेवांमध्ये 52 सुधारणा अंमलात आणल्या जाणार असून, नवे वर्ष – नवे संकल्प – नवी गती या भावनेवर विशेष भर देण्यात आला.
प्रमुख सुधार व ठळक वैशिष्ट्ये
52 आठवड्यांमध्ये 52 सुधारणा – कार्यक्षमता, प्रशासन आणि सेवा वितरणामध्ये व्यापक सुधारणा.
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – गंभीर रेल्वे अपघातांमध्ये जवळपास 90% घट (2014-15 मधील 135 वरून 2025-26 मध्ये 11 पर्यंत), पुढील लक्ष्य हा दर एक अंकीपर्यंत खाली आणणे .
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि प्रगत तंत्रज्ञानाचा विस्तार – सुरक्षा, देखभाल आणि संचालनामध्ये एआय आधारित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला गती.
मनुष्यबळ व प्रशिक्षण सुधारणा – कर्मचारी प्रतिभा व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण पद्धतींमध्ये नवे धोरणात्मक बदल.
रेल्वे खानपान व खाद्यसेवा सुधारणा – प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, सेवा वितरण आणि खानपान व्यवस्थेमध्ये व्यापक सुधारणा.
केंद्रीय राज्यमंत्री, अध्यक्ष, सीईओ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव मांडले.पायाभूत सुविधा पायाभूत विकास, देखभाल, क्षमता विस्तार उपक्रमांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.रेल्वे मंत्रालयाने या बैठकीतून प्रवासी-केंद्री विकास ,तांत्रिक प्रगती, शाश्वत सुरक्षा, सुधारणा यांप्रती आपली ठाम बांधिलकी पुनः अधोरेखित केली.
निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212681)
आगंतुक पटल : 16