संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन परेड 2026, बीटिंग रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सल आणि मुख्य बीटिंग रिट्रीट कार्यक्रमाची तिकीट विक्री 5 जानेवारी पासून सुरू होणार

प्रविष्टि तिथि: 03 JAN 2026 10:59AM by PIB Mumbai

 

26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी, 28 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या बीटिंग रिट्रीटच्या फुल ड्रेस रिहर्सलसाठी तसेच 29 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मुख्य बीटिंग रिट्रीट समारंभासाठी तिकीट विक्री 5 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे.

 

तिकिटांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

1 प्रजासत्ताक दिन परेड (26 जाने)

तिकीट दर: 100 /- आणि 20/-

2. बीटिंग रिट्रीट – फुल ड्रेस रिहर्सल (28 जाने)

तिकीट दर: 20/-

3. बीटिंग रिट्रीट (29 जाने )

तिकीट दर: 100/-

विक्री कालावधी: 05 जानेवारी ते 14 जानेवारी, सकाळी 9 वाजल्यापासून तिकीटांचा कोटा संपेपर्यंत.

दरम्यान, ‘आमंत्रण’ www.aamantran.mod.gov.in या संकेतस्थळावरून थेट तिकीट खरेदी करता येतील: याशिवाय, खालील सहा ठिकाणी असलेल्या काउंटरवरून ओळखपत्र दाखवून (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र/राज्य शासनाने जारी केलेले ओळखपत्र इ.) सादर करूनही तिकीटे खरेदी करता येतील.  

टीप: प्रजासत्ताक दिन, बीटिंग रिट्रीटचा फुल ड्रेस रिहर्सल आणि बीटिंग रिट्रीट या तिन्ही कार्यक्रमांसाठी तेच ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे.

तिकीट काउंटरची ठिकाणे, दिनांक व वेळ

1. सेना भवन (गेट क्रमांक 5 जवळ, संरक्षक भिंतीच्या आतमध्ये)

2. शास्त्री भवन (गेट क्रमांक 3 जवळ, संरक्षक भिंतीच्या आतमध्ये)

3. जंतर मंतर (मुख्य प्रवेशद्वार, संरक्षक भिंतीच्या आतमध्ये)

4. संसद भवन (स्वागत कक्षात)

5. राजीव चौक मेट्रो स्थानक (डी ब्लॉक, गेट क्रमांक 3 व 4 जवळ)

6. काश्मिरी गेट मेट्रो स्थानक (कॉन्कोर्स स्तर, गेट क्रमांक 8 जवळ)

कालावधी : 5 जानेवारी ते 14 जानेवारी वेळ: सकाळी: 10 ते 1, दुपारी: 2 ते 5 वाजेपर्यंत

प्रजासत्ताक दिन समारंभ 2026 संदर्भातील अधिक माहिती पुढील संकेतस्थळावर पाहता येईल: https://rashtraparv.mod.gov.in/

***

हर्षल अकुडे/राज दळेकर/परशुराम कोर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2211021) आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil