मंत्रिमंडळ सचिवालय
प्रगती @ 50: सक्रिय आणि तंत्रज्ञानाधारित शासनाला संस्थात्मक रूप देणे
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2026 7:30PM by PIB Mumbai
कॅबिनेट सचिव आणि इतर विभागीय सचिवांनी आज माध्यमांना प्रगती यंत्रणेच्या (प्रो- ऍक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन- सक्रिय सुशासन आणि वेळेवर अंमलबजावणी.) फलनिष्पत्तीबाबत माहिती दिली. ही यंत्रणा पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.
प्रगती यंत्रणेअंतर्गत असलेल्या प्रकल्पांविषयी आणि समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याच्या प्रणालीबद्दल कॅबिनेट सचिवांनी यावेळी माहिती दिली. या यंत्रणेच्या मदतीने विविध स्तरांवर आणि राज्य सरकारांमध्ये समस्यांचे नियोजनबद्ध निरीक्षण करुन त्या सोडवता येतात.
सुरुवातीला प्रश्न मंत्रालयाच्या स्तरावर सोडवले जातात. मात्र गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे प्रश्न ठराविक संस्थात्मक यंत्रणेद्वारे उच्चस्तरीय पुनरावलोकनासाठी पाठवले जातात आणि शेवटी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रगती बैठकीत त्यांचा निपटारा केला जातो, असे त्यांनी सांगितले.
या टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवण्याच्या यंत्रणेमुळे मंत्रालयांमध्ये समन्वय साधला जातो. वेळेवर निर्णय घेता येतात आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांतील अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करता येते, असे कॅबिनेट सचिवांनी सांगितले. प्रगती ही यंत्रणा जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि प्रकल्पांची अंमलबजावणी वेगवान करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. उच्चस्तरीय निरीक्षण आणि पुनरावलोकनामुळे ही प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते.
***
शैलेश पाटील /प्रज्ञा जांभेकर /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2210983)
आगंतुक पटल : 7