पंतप्रधान कार्यालय
अहमदाबाद ‘फ्लॉवर-शो’ हा सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक भावनेचा उत्सव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसोद्गार
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2026 3:45PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद फ्लॉवर शो’ ने सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यात उल्लेखनीय भूमिका बजावल्याबद्दल प्रशंसा केली आहे. हा कार्यक्रम, शहराचे चैतन्य आणि निसर्गावरील शाश्वत प्रेमाचे सुंदर प्रदर्शन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रदर्शनाचे महत्व अधोरेखित करताना, गेल्या काही वर्षांमध्ये या उपक्रमाला कल्पकतेची जोड मिळाली असून, त्याची व्याप्ती वाढली आहे, आणि यामधून अहमदाबाद शहराची सांस्कृतिक समृद्धी आणि पर्यावरणाबद्दल असलेली सजगता प्रदर्शित होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या एक्सवरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
“अहमदाबाद फ्लॉवर-शो सर्जनशीलता, शाश्वतता आणि समुदायाचा संगम असून, शहराचे चैतन्य आणि निसर्गाबद्दलचे प्रेम याचे सुंदर प्रदर्शन घडवतो. गेल्या काही वर्षांत या पुष्प प्रदर्शनाची व्याप्ती आणि त्यामधील कल्पकता वाढली आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.”
“अहमदाबाद फ्लॉवर शो सर्वांना मोहित करणारा आहे! सर्जनशीलता आणि लोकसहभागाचा हा अद्भुत वस्तुपाठ आहे. यामधून या शहराचे चैतन्य आणि निसर्गाची ओढ, याचे सुंदर प्रदर्शन घडते. या फ्लॉवर-शो ची भव्यता आणि कल्पकता यामध्ये दरवर्षी भर पडत आहे, हे पाहणे देखील उत्साहवर्धक आहे. या फ्लॉवर-शो ची काही आकर्षक छायाचित्रे...”
***
नेहा कुलकर्णी / राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210820)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam